पुणे (प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले) – राज्यात वाढणारा कोरोनाचा संसर्ग कमी करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने एक महत्वाकांक्षी कार्यक्रम घेतलेला आहे, त्याच्यामध्ये “माझं कुटुंब… माझी जबाबदारी…” हे त्याचे मुख सूत्र आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक कुटुंबाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची आणि कोरोना पसरणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
कुटुंबामध्ये कोणी जर आजारी असेल, कोणाला ताप येत असेल, सर्दी झाली असेल किंवा कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसत असतील तर त्यांनी ताबडतोब संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून दिली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी दोघांनी आवाहन केले आहे. एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्ती पर्यंत पोहोचयाचे, गावागावांमध्ये सर्वेक्षण करायचे, प्राथमिक अवस्थेत असलेले पेशंट तपासायचे आणि त्यांच्यावर उपचार त्याठिकाणी सुरू करायचे. हे जर आपण केलं नाही तर कोरोना आजार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असलेली संख्या मग त्याचा परिणाम हा अधिक सगळ्या भागाला त्या ठिकाणी सहन करावा लागतो.
एका बाजूला आपण आरोग्य सुविधा उभ्या करतो. दुसऱ्या बाजूला कोव्हिडं केअर सेंटर सूरु करतो आहोत. आता काही खाजगी हॉस्पिटलला सुद्धा रुग्णांवर उपचार करायला परवानगी देण्यात आलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची, आपल्या गावाची, आपल्या मळ्याची जबाबदारी घेणे हे निश्चित प्रकारे उपयोगाचे ठरणार आहे. हा राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही, हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या हिताचा, राज्याच्या हिताचा, सर्वसामान्य माणसाच्या हिताचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संस्था व स्वयंसेवी संस्था सहभागी होऊन या कार्यक्रमाला सहकार्य करावे, अशी आग्रहाची विनंती शिरूर-हवेलीचे आमदार अशोकबापु पवार यांनी सर्वांना केली आहे.







