भुसावळ तालुका वकील संघातर्फे हातरस बलात्कार व हत्येचा तीव्र निषेध

bhusawal-vakil-sangh

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – दिनांक 14/ 9 /20 रोजी उत्तर प्रदेशातील हातरस येथे घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा भुसावळ वकील संघाकडून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या उत्तर प्रदेश मधील हातरस येथील बलात्कार व हत्याकांडाचा भुसावळ तालुका वकील संघातर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून झालेली पीडित परिवाराची हेडसांड आणि मिडियाची मुस्कटदाबी यासारख्या अक्षम्य अपराधाचा भुसावळ तालुका वकील संघ निषेध व्यक्त करत आहे.संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकणाऱ्या सरकारचा निषेध.
सत्य जनतेसमोर येऊ नये म्हणून लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या मिडियाला रोखणाऱ्या असंवेदनशील सरकारचा निषेध.अथक प्रकरणाची सीबीआय चौकशी होऊन सदरचा खटला आरोपींविरुद्ध उत्तर प्रदेश सोडून देशाचा अन्य न्यायालयात चालविण्यात यावा पीडित परिवाराला संरक्षण देण्याची मागणी भुसावळ वकील संघ करत आहे.
निर्दयी आरोपी विरुद्ध खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भुसावळ वकील संघ करत आहे. महिलावर्गाची हेळसांड ठोकण्यात अयशस्वी झालेल्या सरकारचा निषेध करण्यात आला.
याप्रसंगी ॲडव्होकेट जास्वंदी भंडारी (महिला प्रतिनिधी),ॲडव्होकेट तुषार पाटील ,चित्रा आचार्य ,सुचित्रा बैसवाल , विजया कारडे, सुमन सपकाळे, संगीता चंदन, संजय तेलगोटे आदी वकील मंडळी उपस्थित होते.bhusawal-hatrus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here