घटत्या रुग्णसंख्येने जिल्हा प्रशासनाला दिलासा; ३३१ कोरोनाबाधित नव्याने आढळले
जळगाव (प्रतिनिधी) – आज (दि.४) सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आल्यानंतर ३३१ कोरोनाबाधित आढळून आले तर याच संख्येच्या दुप्पपट ६५३ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनावर यशस्वीपणे मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ४९ हजार ४३५ झाली आहे.
आज आढळलेल्या ३३१ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर -६८, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-२४, अमळनेर-५, चोपडा-१२, पाचोरा-१३, भडगाव-६, धरणगाव-२, यावल-०, एरंडोल-१, जामनेर-१०१, रावेर-८, पारोळा-३, चाळीसगाव-७३, मुक्ताईनगर-९, बोदवड-२ आणि अन्य जिल्हा १ असा समावेश आहे.
दरम्यान, आज सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा १ हजार २०४ झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४ हजार ४३० कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







