भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – मराठा आरक्षणावर स्थगिती मिळाल्याने, शहरातील सकल मराठा समाजाने आमदार संजय सावकारे यांच्या घरावर आक्रोश आंदोलन करीत त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
या निवेदनात मराठा आरक्षणावरील सर्वोच्य न्यायलयातील अंतरीम स्थगिती उठविण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. ती स्थगिती राज्य सरकारने त्वरीत उठवावी, मराठा समाजाच्या मुलामुलींचे चालु आर्थिक वर्षापासून फी परतावा राज्य सरकारकडून मिळावा. त्याच बरोबर केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले, त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा, सर्वात महत्वाचे महाराष्ट्र सरकारकडून येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १००० कोटींची तरतुद करावी, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबाचे पुर्नवसन करावे, मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे. मराठा आरक्षण आंदोलनात बलीदान दिलेल्या कुटूंबाना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी, अरबी समुद्रातील शिवस्मारकांचे काम तातडीने सुरु कराये. तसेच राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करावी, कोपड़ी प्रकरणातील दोरषींच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर राज्यातील गड किल्यांचे संवर्धन करण्यासाठी ५०० कोटींची तरतुद करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
सकल मराठा समाजाची शैक्षणिक व नोकरीमध्ये असलेली आरक्षणाची मागणी मान्य होईपर्यंत सकल मराठा समाज,रावेर तालुका यांचा लढा असाच सुरु राहील व गनिमीकावा पद्धतीने विविध आंदोलने करण्यात येतील, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी मोर्चाद्वारे आलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलकांचे प्रश्न आ.सावकारे यांनी ऐकून घेतले व मराठा आरक्षणासोबत आपण असून, या प्रश्नी आपण स्वतः लक्ष घालू, असे आश्वासनही त्यांनी उपस्थितांना दिले.
याप्रसंगी किरण पाटील, दीपक मराठे, पंकज पाटील, अनिल पाटील , योगेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पवन मराठे, गिरीश पवार, प्रमोद पाटील, किशोर पाटील, एकनाथ धांडे ,उमेश पाटील ,अतुल चौधरी आदी समाज बांधव उपस्थित होते..







