जिल्हास्तरीय जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची बैठकीत आमदार सौ लताताई सोनवणे यांनी केल्या विविध मागण्या.

चोपडा (नंदलाल मराठे) – जिल्हास्तरीय जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची बैठक पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. बैठकीत चोपड्याच्या शिवसेनेचे आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी विविध मागण्यांसाठी आवाज उठवला. यावेळी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी सदरील मागण्या पूर्ततेसाठी आश्वासन दिले आहे.
मागण्या खालील प्रमाणे१}उपजिल्हा रूग्णालयात पुर्ण १०० बेडसाठी सेंट्रल आॅक्सिजन सिस्टीम व आॅक्सिजन काॅन्सनट्रेटर बसविण्यासाठी निधी मंजुर करावा.२} चोपडा उपजिल्हा रुग्णालयात कोविड १९ वाढत्यासंख्येच्या विचार करता चोपडा उपजिल्हा रूग्णालयात १० बेडचे आय.सी.यु.वार्ड बनविणे आवश्यक आहे.
३}चोपडा उपजिल्हा रूग्णालयात १२ वर्ष जुनी रूग्ण वाहिका वारंवार खराब होत असल्याने रूग्णाची गैरसोय होते त्यासाठी चोपडा उपजिल्हा रूग्णालयसाठी १ नविन अद्दयावत रूग्णवाहिका मिळावी.४}सध्या कोविड केअर सेंटर साठी स्वतंत्र स्टाफ नसून शालेय आरोग्य तपासणी पथकामधील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना आदेशीत केले आहे तरी सदर कोविड केअर सेंटर साठी स्वतंत्र सहा कंत्राटी वैद्यकीय अधिकारी,तीन कंत्राटी औषध निर्माण अधिकारी,सहा कंटात्री आरोग्यसेविका,चार कंटात्री शिपाई व सुरक्षारक्षक मिळणे आवश्यक आहे. ५}चोपडा मतदारसंघात चोपडा व यावल तालुक्यात संघात रूग्णांची वाढती संख्या पाहता दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येत आहे सदर सर्वेक्षण करत असताना प्रत्येक आशा स्वयंमसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांकडे रुग्णांचा ताप मोजण्यासाठी थर्मल स्कॅनर व फुफ्फुसांची क्षमता तपासण्या करिता पल्स ऑक्सिमीटर ही उपकरणे आवश्यक आहेत ती त्वरित उपलब्ध करावीत.
६} चोपडा व यावल तालुक्यासाठी पी.पी . ई . किट्स , N – 95 मास्क व सॅनिटायझर ग्लोव्हज,फेसशिल्ड,सॅनिटायझर स्टॅन्डचा पुरेसा पुरवठा करावा.७}प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर अतिरिक्त आॅक्सिजन सिलेंडर मिळावे.८}चोपडा येथे कोरोना संशयीत रूग्णांची वाढती संख्या बघता संस्थातमक कोरोन्टीन करणेसाठी अजुन एक जास्त क्षमतेची सर्व सुविधायुक्त ईमारत मिळावी.
९} ग्रामीण भागातील चोपडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र व स्तरावरील आरोग्य सेविकांची २२ पदे व यावल तालुक्यातील आरोग्य सेविकांची ११ पदे रिक्त असून या पदांची शासनस्तरावरून तात्काळ भरती करण्यात यावी. १०}एन.एम.एच अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र चोपडा येथे पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्याने या पदाची तात्काळ भरती करण्यात यावी.
वरील मागण्यांचे लेखी स्वरूपात निवेदन पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या कडे सादर केले त्यावेळी सदर मागण्यांबाबत ठोस विचार करून पूर्ण करण्याबाबत आश्वासन पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी दिले. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, खासदार उन्मेश पाटील,आमदार गिरीष महाजन,आ.संजय सावकारे,आ.सुरेश भोळे,आ.सौ लताताई सोनवणे,चंदुभाई पटेल (वि.प.स.),आ.चंद्रकांत पाटील,आ.मंगेश चव्हाण,आ.अनिल भाईदास पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील,पोलिस अधिक्षक पंजाबराव उगले,मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी,अध्यक्ष जात पडताळणी प्रमाणपत्र समिती गोरक्ष गाडीलकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.जयप्रकाश रामानंद,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण,जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद डाॅ.दिलीप पोटोडे यांच्यासह इतर अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here