हाथरस प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्या : वंचित बहुजन आघडीचे नवी मुंबई त निदर्शने

thane-nishedh

योगी आदित्यनाथ यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी

 

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) –  हाथरस प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत या प्रकरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघडीचे नवी मुंबईच्यावतीने कोकण भवन येथे निदर्शने करण्यात आली. योगी आदीनाथ यांच्या फोटो ला जोडेमार आंदोलन केले.

 

रेखा ठाकूर महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. वंचित बहुजन आघडीचे नवी मुंबईचे आनंद जाधव नवी मुंबई निरीक्षक वंचित बहुजन आघडीचे नवी मुंबईचे माजी जिल्हाध्यक्ष विरेंद्र लंगाडे व शिल्पा रणदिवे, राम भद्रे , कासारे , आयु.राजेद्र बनसोडे, सचिन जोगदंड, गौतम गायकवाड , नैनेश कटके, अॅड मोरे साहेब , कल्याणराव हनवते, सुरेश हिंगोले, गौतम चव्हाण. राहुल जावळे, संजय केदारे , दिपक गायकवाड, संतोष मनोरे, बाबासाहेब मेहते, शंकर पडुळकर, व महिला प्रमुख शिल्पा रणदिवे मॅडम, पद्मिनी रणदिवे,अशोक शेगावकर, राहुल शिरसाठ, भुषण कासारे प्रभावती हिंगोले यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 

हाथरस प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी,  महिला पत्रकाराला मारहाण केली आहे. बलात्कारातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. योगी आदित्यनाथ यांना या प्रकरणात सहआरोपी करावे. अशा मागण्या वंचित बहुजन आघडीचे नवी मुंबई केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here