नौपाडा बी केबिन गौतम वाडी येथील घरकाम करणाऱ्या भोळ्याभाबड्या महिलांची फसवणूक करून पोबारा केला.

naupada-thane-case

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – दि.०४/०९ प्रभाग क्रमांक 21 येथील स्थानिक नगरसेविका सौ प्रतिभा राजेश मडवी यांच्या प्रभागातील घरकाम करणाऱ्या भोळ्याभाबड्या महिलांची मनोज पवार यांच्याकडून घोर फसवणूक तीन ते चार वर्षापासून होत आहे तरी या महिला गोरगरीब जनतेचे विचार ऐकून घेणारे समाजसेवक व माझे ठाणे शहर उपाध्यक्ष भाजपा राजेश मडवी साहेब यांच्याकडे तक्रार केली असता याची संपूर्ण माहिती घेतली.

 

त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे धाव घेतली असता त्यांच्या लक्षात आले की मनोज पवार हा इसम गेल्या दोन-तीन वर्षापासून या घरकाम करणाऱ्या महिलांना लोन काढून देऊन तेलोन त्यांना न देता त्यांच्याकडून हप्ते वसुली करणे EMI पण त्यांना कोणतीही रक्कम न देता धमकी देणे हे सतत महिला सहन करत होत्या पूर्णपणे चौकशी केल्यावर ती स्थानिक नगरसेविका यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी पोलीस प्रशासनाकडे धाव घेऊन संबंधित व्यक्ती वरती तक्रार दाखल केली.

 

राजेश मडवी आणि सौ प्रतिभा मडवी यांना नौपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माननीय श्री मांगले साहेब यांनी 420 कलम धोका धडी हा गुन्हा दाखल करण्याचे सांगितले व त्या इसमाला राहत्या घरी मुरबाड येथून आणण्याचे कारवाई सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here