लोकल ट्रेन पूर्ववत करा; संभाजी ब्रिगेड दक्षिण मध्य मुंबई जिल्हाच्यावतीने स्वाक्षरी मोहीम

sambhaji-bigrade-mumbai

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – केंद्र सरकारने कोविड – १९ अन्वये प्रचलित परिस्थिती पहाता. कोरोना वायरस नियंत्रणात आणण्यासाठी लाॅकडाऊनची घोषणा करून मुंबईची लाइफ लाईन (धमणी) उपरगरीय रेल्वे (लोकल) बंद केली. नंतर केवळ अतीआवश्यक वर्गवारील वव्यक्तींना लोकल ट्रेनमधे प्रवास करण्यासाठी परवानगी दिली. परंतु मुंबई कल्याण कसारा कर्जत दरम्यान नोकरी व्यवसाय रोजगारच्या निमित्ताने लोकलचा नियमीत प्रवास करणारी व्यक्ती लोकल बंद असल्याने बेरोजगार झाले.sambhaji-bigrade-mumbai1

 

 

असेच चित्र राहील्यास बेरोजगारीने चोरी भुकबळी आत्महत्या होईल. सदर परिस्थिती अटोक्यात आणण्यासाठी त्वरीत लोकल सुरू करणे महत्त्वाचे ठरते. या करीता संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सोमवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी संपूर्ण मुंबईत रेल्वे स्थानक शेजारी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. सदर विषयी मुंबईकरांनी स्वाक्षरी मोहीमेत मोठ्ठा प्रमाणात सहभागी होउन सरकारने तातडीने लोकल ट्रेन सुरू करावी. असे मनोगत व्यक्त केले.

 

या संदर्भीय राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री रेल्वेमंत्री महोदयांना निवेदन सादर करण्यात येईल असे संभाजी ब्रिगेडचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष बाबा सावंत यांनी सांगितले. तसेच मुंबई अध्यक्ष शिवश्री दिनेश महाडिक व मुंबई कार्याध्यक्ष शिवश्री राजेंद्र कांबळे, मुंबई उपअध्यक्ष शिवश्री शाहिद कुरेशी यांनी दक्षिण मध्य मुंबई जिल्हाला भेट देऊनी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. दत्तात्रय कोळेकर सचिव , संजय मादीगर,कोषाध्यक्ष,इम्रान शेख,उपाध्यक्ष, प्रमोद सिंह सहसंघटक व परवेज शेख, रामशंकर सरोज, शिवकुमार गुत्ता आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here