वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या महिला आघाडीच्या वतीने शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) उल्हास नरड यांना निवेदन सादर केले महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद महिला आघाडी सर्व सदस्यांनी माननीय शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
दिनांक 24 /6/ 2000 शासन परिपत्रक व 30/10/ सप्टेंबर च्या दोन पत्रानुसार जिल्ह्यातील सर्व महिला शिक्षिकेला वर्क फ्रॉम होम करण्याची सवलत दिलेली आहे परंतु जिल्ह्यात काही मुख्याध्यापक व काही संस्थाचालक शिक्षिकांना जाणून-बुजून दररोज 11 ते 5 शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करीत आहेत त्याकरिता महिला आघाडी प्रमुख सौ. मनीषा साळवे सहप्रमुख कु. शुभांगी चिकटे वर्धा तालुकाध्यक्ष सौ सुजाता जोशी सौ आचार्य मॅडम यांनी निवेदन सादर केले.त्याप्रसंगी अनेक महिला शिक्षक उपस्थित होत्या.
वर्क फ्रॉम होम करण्याची सवलत असतांनासुद्धा जबरदस्तीने रजा लावतात अशा प्रकारे शिक्षिकेला वेठीस धरीत आहे आजच ठाणे जिल्ह्यामध्ये एका शिक्षिकेला मुख्याध्यापिका जबरदस्तीने शाळेत बोलावत होत्या आणि त्यांची प्रकृती बरोबर नसतांनासुद्धा त्यांनी त्यांना शाळेत बोलावत होत्या व त्यामध्येच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशा घटना जिल्ह्यांमध्ये होऊ नये त्याकरिता माननीय शिक्षणाधिकारी यांनी सर्व मुख्याध्यापकांना पत्र द्यावे असे या निवेदनात स्पष्ट केले आहे. 







