नवरात्र उत्सव: सात फूट उंचीची दुर्गा मातेच्या मूर्ती विकण्याची परवानगी देण्यात यावी-महाराष्ट्र कुंभार समाज

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – महाराष्ट्रासह संपूर्ण शहर व जिल्ह्यातील नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांना रीतसर परवानगी देऊन नवदुर्गा मातेच्या मुर्तीची उंची चार फुटा वरून सात फूटा ची मूर्ती बसविण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे महाराष्ट्र कुंभार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

 

कुंभार समाज महाराष्ट्र युवाप्रदेश अध्यक्ष संजय जोरले यांनी मा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मेलच्या माध्यमातून निवेदन सादर करून त्यात म्हंटले आहे की, गणेशोत्सवात कुंभार समाजातील मूर्तिकार कारागिरांच्या मूर्ती बनविल्या नंतर सरकारने गणेशमूर्ती वर उंची बाबत ज्या अटी घालून दिल्या होत्या त्यामुळे अनेक मूर्तिकराच्या गणेश मूर्ती तशाच पडून राहिल्या आहे.त्यामुळे अनेक कुंभार बांधवाचे संसार उद्धवस्त झाले आहे.अनेकजण कर्ज बाजारी झालेले आहे.

 

गणेशमूर्ती चार फुटा पेक्षा मोठी नसावी हा नियम कुंभार मूर्तिकार बांधवांसाठी जीवघेणी ठरत आहे.त्यामुळे कुंभार मूर्तिकरा बाधवाचा साहानुभूतीने विचार करून नवदुर्गा मातेच्या मूर्तीची उंची चार फूट न ठेवता सात फुटापर्यंत ठेवावी. नवदुर्गा मुर्ती चार फुटापर्यंत आकर्षण ठरणार नाही कारण नवदुर्गा माता मूर्ती व वाघ या दोघांची एकूण उंची सात फुटापर्यंत असेल तरच मूर्ती सुदृढ,सुबक, व मूर्तीत जिवंतपणा वाटेल.त्यामुळे नवदुर्गा मातेच्या मूर्तीची उंची चार फूट ऐवजी सात फूट नवदुर्गा मूर्ती बनवण्याची परवानगी देण्यात यावी यामुळे कुंभार समाजातील मूर्तिकराचे आर्थिक गणित जुळवून येईल.

 

 

महाराष्ट्रतील शहर व जिल्ह्यातील नवदुर्गा उत्सव सार्वजनिक मंडळांना नवरात्रत देवी बसवून देण्याची रीतसर परवानगी देण्यात यावी.जेणेकरून नवदुर्गा मातेच्या मूर्ती जास्त प्रमाणात विकल्या जातील व त्यामुळे कुंभार मूर्तिकार समाजाला आर्थिक दिलासा मिळेल व संपूर्ण जिल्ह्यातील विविध तालुक्यातील व शहरातील जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेत मूर्त विकण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी कुंभार समाज महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here