खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – केंद सरकारने जे तीन विधेयक पारीत केले ते शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. या कायद्याला शेतकऱ्यांचा पाठिंबा असताना राज्यातील महाआघाडी सरकारने राज्यात हा कायदा लागू न करण्याचा स्थगिती आदेश काढला. हा आदेश रद्द करावा या मागणीसाठी बुधवार रोजी खुलताबाद येथील तहसील कार्यालयासमोर भाजपच्या वतीने त्या अध्यादेशाची कार्यकर्त्यांनी होळी केली.
यावेळेस भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे,पंचायत समिती सभापती गणेश आधाने, न.प.उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, शहराध्यक्ष सतिष दांडेकर, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, नगरसेवक योगेश बारगळ, परसराम बारगळ, राज्य परिषद सदस्य मुरलीधर पाटील दांडेकर, माजी नगरसेवक आशिष कुलकर्णी,अविनाश कुलकर्णी युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रवीण बारगळ, किशोर भावसार, दिनेश कायस्थ, गणेश सावजी,राहुल हजारे, बाबासाहेब वाकळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.







