वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – आज दिनांक 7 ऑक्टोबर 2020 ला मा. श्री सुधाकर अडबाले सरकार्यवाह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यांच्या नेतृत्वात मा संजय बोधडकर अधीक्षक वेतन पथक चंद्रपूर यांची भेट घेण्यात आली.
भेटीदरम्यान खालील विषयावर चर्चा करण्यात आली. अधीक्षक वेतन पथक चंद्रपूर यांनी दिनांक 1 ऑक्टोबर 2020 ला काढलेल्या पत्राच्या अनुषंगाने मुद्दा क्रमांक 16 संदर्भाने डीसीपीएस धारक शिक्षक कर्मचारी यांनी nps फॉर्म भरण्यास नकार असल्याबाबतचे प्रमाणपत्र भरण्यास सांगितले होते. परंतु आज त्यांची भेट घेतली असता सदर प्रमाणपत्र रद्द करण्यात येऊन रीतसर तसे मुख्याध्यापक यांना कळविण्यात येणार असल्याचे सांगितले.
NPS फॉर्म भरण्यास कुणालाही जबरदस्ती नसल्याचे अधीक्षक वेतन पथक यांनी सांगितले. NPS फॉर्म भरला नाही तरी कुणाचेही पगार कपात होणार नाही. मार्च 2020 पर्यंत सर्व हिशोब क्लिअर असून ज्यांना पावत्या प्राप्त झाल्या नाही त्यांना लवकरच पावत्या प्राप्त होणार आहेत ज्यांच्या पावतीवर स्वाक्षरी नाहीत त्यांना नव्याने पावती देण्यार असल्याचे सांगण्यात आले.
Dcps कपातीच्या पावती संदर्भाने कोणत्याही अडचणी असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा समस्या तात्काळ निकाली काढण्यात येणाचे सांगितले. NPS बाबतीत कुणालाही सक्ती करण्यात येणार नसून, NPS चे फायदे वा तोटे संदर्भाने प्रशिक्षण देण्यात यावे असे विचारले असता,शासन स्तरावरून तशी कोणतीही माहिती प्राप्त नसल्याचे सांगितले व कोरोना काळ असल्याने तसे प्रशिक्षण सुद्धा कठीण आहे अशी माहिती देण्यात आली.
ऑनलाइन सभेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अद्यापही का मिळाली नाही असे प्रश्न विचारला असता पुनश्च एकदा सभा लावून सर्व प्रश्नांची उत्तरे देनार असल्याची माहिती देण्यात आली. तूर्तास कोणीही nps फॉर्म भरू नये या विषयावर बऱ्याच वेळ चर्चा करण्यात आली व अधीक्षक वेतन पथक चंद्रपूर यांनी सहकार्याची भूमिका घेतली. सदर भेटीदरम्यान श्रीहरी शेंडे जिल्हा कार्यवाह वि. मा. शि.संघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संगठन जिल्हा शाखा चंद्रपूरचे जिल्हा सचिव निलेश कुमरे, प्रशांत खुसपुरे जिल्हा कार्याध्यक्ष, भालचंद्र धांडे तालुका अध्यक्ष विमाशि चंद्रपूर, रवींद्र मत्ते जिल्हा प्रतिनिधी, संदीप शेंडे, प्रवीण पुनवटकर, अभिनित गेडाम उपस्थित होते. तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चे शहराध्यक्ष सुरेंद्र अडबाले व दिवाकर ठाकरे सल्लागार नागभीड उपस्थित होते.







