ठाणे (विशेष प्रतिनिधी) – ठाणे शहरातील नामवंत श्री शिवाजी पाटील महाराष्ट अध्यक्ष कामगार सघटना ठाणे शहर मा. उपाध्यक्ष श्री राजेश मढवी साहेब , तसेच वागळे विभागात पोलीस कर्मचारी, प्राणी मित्र ,होमगार्ड जवान, व विविध पक्षातील समाजसेवक यांना महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे कोरोना योद्धा म्हणून श्रीनगर पोलिस स्टेशनचे गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनकर चंदनकर साहेब आणि श्री सतीश बनसोडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन संस्थापक रवी वैद्य, सिद्धार्थ जाधव प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे विभागातील विविध पद्धतीने कोरोना कालावधीमध्ये काम केलेले पोलीस नाईक श्री वनमाने श्रीनगर पोलिस ठाणे, श्री दगडू पवार होमगार्ड ठाणे पथक, प्राणी मित्र दींदयाल शर्मा यांना श्री सतीश बनसोडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
समाजसेवक:- शैलेश कदम, राम अटवाल, रामनिवास डिलोड, सुनील चव्हाण, कृष्णकुमार सोडरी, जगन सिंह, लक्ष्मण बालशंकर या सर्वांना कोविड योद्धा सन्मानपत्र व मास्क देताना श्रीनगर पोलिस स्टेशनचे गुन्हे निरीक्षक दिनकर चंदनकर साहेब , तसेच,बुलंद पोलीस टाइम्स महाराष्ट्र उपसंपादक,व महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन तथा होमगार्ड संघर्ष समिती ठाणे शहर अध्यक्ष सतीश बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आले.







