जळगाव (संपादक सुनिल पाटील) – कोरोना युध्दात अनेक कोरोनायोध्दे जसे की, डॉक्टर, पोलीस आणि नर्स हे स्वत:च्या जिवावर
उदार होऊन प्रतिकुल परिस्थितीत काम करीत आहेत. लॉकडाऊनच्या काळात लोकांची काळजी घेण्यासाठी अहोरात्र पोलीस दलाने रस्त्यावर बंदोबस्त ठेवून कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले आहे. या कोरोनायोध्दा पोलिसांच्या परिश्रमाचे व त्यागाचे कौतुक करण्यासाठी जनमत प्रतिष्ठान करून ‘सलाम खाकी वर्दीला’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज (दि.१) जनमत प्रतिष्ठान कडून जिल्हा पेठ पोलीस स्टेशन व शनिपेठ पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना लॉकडाऊन कालावधी केलेल्या कार्याबद्दल त्यांना जनमत प्रतिष्ठानकडून ‘सलाम खाकी वर्दीला’ या 
उपक्रमातंर्गत जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले याप्रसंगी भारतीय महिला शिक्षिका आघाडी शितलताई जडे, पोलीस सेवा संघटना जिल्हाध्यक्ष भावेश ठाकूर, हर्षल पाटील, तिलक तंदास बोंडे, वजमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज आले, प्रा.रफीक शेख, उपस्थित होते,







