- औरंगाबाद धुळे राष्ट्रीय महामार्ग वर अपघात
- सुदैवाने टळला मोठा अनर्थ एक महिला जखमी.

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्ग वरील सुलीभंनज येथील टी पॉईंट वर एका आयशर चालकांचे नियंत्रण सुटल्याने तीन रिक्षा व एका मोटार सायकल ला चिरडून एका हॉटेल मध्ये घुसला. मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्ग वरील सुलीभंनज येथील टी पॉइंट वर एक आयशर क्र MH-21 BM-2049 दुपारी तीन वाजेच्या दरम्यान धुळे कडून औरंगाबाद चालले होते. आयशर टी पॉईंट वर आल्यानंतर आयशर चालकांचे वाहनवरील नियंत्रण सुटले व आयशर सरळ एका हॉटेल मध्ये घुसले व रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या गर्दीच्या ठिकाणी येऊन थांबले. व त्यामध्ये एक मागुन एक उभ्या असलेल्या रिक्शा अशा तीन ऑटो रिक्षा व एक उभ्या असलेल्या मोटार सायकल जा जाऊन धडकला व शेवटी हॉटेलमध्ये जाऊन उभा राहिला.
मुख्य म्हणजे खुलताबाद येथील सुलीभंनज टी पॉइंट वरून एक रस्ता खुलताबाद शहरात व एक रस्त्या औरंगाबाद कडे जातो तसेच रस्त्यासमोर समोर आय टी आय महाविद्यालयात असल्याने या पाइंट वर नेहमी माणसाची वर्दळ सुरू असते. अपघात झालेल्या आयशर सरळ येत असल्याचे पाहून रस्त्यावर उभ्या असलेल्या माणसाने आरडाओरडा केल्याने रिक्षात व हॉटेल मध्ये बसलेल्या नागरिकांना क्षनाचाही विलंब न करता उभ्या ,बसल्येल्या ठिकाणावरून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला.
या अपघातात एका रिक्शामधील एक महिला किरकोळ जखमी झाली असून या मध्ये मोटार सायकल क्र MH 20- DG- 6105 चा पूर्ण चुराडा झाला असून ऑटो रिक्षा क्र MH-20 DC-3902,MH-20 DJ-9272 व MH-20 DC 2597 या तीन रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.सदर अपघात घडताच आयशर चालक फरार झाला असून पुढील तपास पोलिस करत आहे.मात्र परिसरातील नागरिकांनी धूम ठोकल्याने अनेकांचे प्राण वाचले.







