योग्य तपास करुन गुन्हेगारांना अटक केल्या जाईल-पोलिस निरिक्षक संजय ठेंगे
चोपडा (तालुका प्रतिनिधी संदीप ओली) – भाजपा चे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र पांडूरंग सोनवणे यांना वाळूमाफीयांकडून दिनांक २ अॉक्टोबर रोजी गावठी पिस्तुलचा धाक दाखवून निर्दयीपणे मारहाण करण्यात आली होती यामुळे तालुक्यात गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी दहशत निर्माण केली होती त्याविरोधात व प्रशासनाच्या विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार होता.
शहर आणि तालुक्यामधे दोन-तीन वर्षाच्या कालावधीत ज्या दहशतीच्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना अत्यंत वाईट आहेत.हा मोर्चा एखाद्या समाजाच्या किंवा व्यक्तीच्या विरोधात नसून दडपशाही विरोधात आहे.या तालुक्यात अशा हाणामारीच्या व दहशतीच्या घटना यापूर्वी कधीच घडलेल्या नाहीत.तरी या घटनेकडे येथील स्थानिक प्रशासनाने गांभिर्याने दखल घ्यावी कि भविष्यात असे गुंडगिरीचे प्रकार घडता कामा नये. जर असे झाले नाही तर यापुढेदेखील याबाबतीत पोलिस अधीक्षकांसह,गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन न्याय मागू शकतो.तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करावा व दहशत थांबवावी यासाठी पोलिस आणि महसूल प्रशासना च्या विरोधात सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक यांनी दिनांक ९ रोजी मोर्चा नेण्याचे ठरविले होते.मात्र तहसिलदार छगन वाघ आणि चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी कलम १४४ लागू असल्याने मोर्चा काढता येणार नाही असे सांगितल्याने चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवरातून मेनरोड मार्गे तहसिल कार्यालय असा सर्वपक्षिय मोर्चा नेला जाणार होता.तो रद्द झाल्यामुळे त्याचे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच बैठकीत रुपांतर झाले. तेथे तहसिलदार छगन वाघ व पोलिस निरिक्षक संजय ठेंगे यांनी येऊन सर्वपक्षियांचे म्हणणे जाणून घेतले.
व आरोपी जे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होऊन त्यांना शिक्षा होईल अशी भुमिका पोलिस निरिक्षक संजय ठेंगे यांनी मांडली.व यापूढे अवैद्य वाळूवाहतुक थांबविण्याकरीता शहराच्या सर्व दिशा पोलिस प्रशासनामार्फत बंद करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने या बैठकीत न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.आरोपी जे असतील त्यांच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे.जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे यांना आरोपी करून जे कलम लावले आहेत ते तपासून ते कलम काढून घेऊ असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी आश्वासन दिले त्यामुळे तुर्तास हा मोर्चा इथेच थांबवूया परंतु जर प्रशासनाने संबंधित आरोपींवर कठोर कारवाई न केल्यास आपण परत मोर्चा काढणार वाटल्यास तेव्हा आम्हाला अटक केली तरी चालेल असेही अरुणभाईंनी सांगितले.
तसेच अरुणभाई गुजराथी म्हणाले कि 50 वर्षाच्या राजकीय जिवनात आपल्या तालुक्यात अशे प्रकार घडलेले नाहीत.तरी जो प्रकार घडला आहे तो निंदनिय आहे.एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा जिल्हा परिषदेत निवडून आलेला लोकप्रतिनिधी घाबरून, भितीने केस दाखल करू शकत नाही,एफआयआर दाखल करू शकत नाही हे फारच भयानक आहे.म्हणून या दहशतीचा कायमस्वरुपी बंदोबस्त करा. यासंदर्भात याठिकाणी राष्ट्रवादी,भाजपा,मनसे,रिपाई व शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटिलांचा गट इ. नेते जमलेले आहेत.असेही विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी सांगितले. या मोर्चासाठी जमले असताना अनेक राजकीय पदाधिकार्यांनी अधिकार्यांना खडे बोल सुनावले.
मोर्चासाठी जमलेले व नंतर बैठकीत रूपांतर झालेल्या या सभेमध्ये शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील,जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्ष इंदिराताई पाटील,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख तात्या पाटील,चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन घनश्याम निंबा पाटील,चोपडा पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी,नगरपालिका गटनेते जिवन चौधरी,मनसेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल वानखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव रायसिंग,भाजपाचे ज्येष्ठ नेते शांताराम पाटील,भाजपाचे माजी पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके,पंचायत समितीचे माजी सभापती डी.पी. साळुंखे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,भाजपाचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जयस्वाल,माजी पंचायत समिती उपसभापती गोपाळ सोनवणे,व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृत सचदेव,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील,चोपडा साखर कारखान्याचे चेअरमन अतुल ठाकरे,शेतकी संघाचे प्रेसिडेंट एल.एन.पाटील,कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण पाटील,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माजी सदस्य बाळासाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोपाल पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कांतिलाल पाटील,प्रविण गुजराथी,देवेंद्र सोनवणे,संजीव सोनवणे,निलेश बारी,प्रमोद बोरसे यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर विविध पदाधिकारी,भाजपाचे इतर तालुका आणि शहर पदाधिकारी,मनसे चे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इतर पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि चोपडा शहरासह तालुक्यातील विविध संस्थांमधील संचालक पदाधिकारी आणि सर्व सामान्य नागरिक या मोर्चा वेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.







