चोपडा (तालुका प्रतिनिधी संदीप ओली) – छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक शिवरत्न वीर जिवाजी महाले यांचा ३८५ व्या जयंती निमित्त आज चोपडा येथे नाभिक समाजाचा पंचमढीत सकाळी ९ वाजता नाभिक समाजा तर्फे शिवरत्न वीर जिवाजी महाले त्यांच्या प्रतिमेला पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी शिवरत्न वीर जिवाजी महाले संघटनेचे तालूका अध्यक्ष दिनेश जगताप यांनी शिवरत्न विर जिवाजी महाले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवरत्न विर जिवाजी महाले यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली .
यावेळी मनोहर सोनगीरे, दिनेश जगताप,सोपान बाविस्कर, उमाकांत निकम,विनोद निकम,बापू पवार,देवा बाविस्कर, गणेश खोंडे, सुभाष सेंदाणे,लक्षण बाविस्कर, प्रदीप बाविस्कर, योगेश ठाकरे, दिलीप ठाकरे,धनराज पगारे, विरु सूर्यवंशी, उमेश निकम,हिरालाल सोनवणे, बाळा निकम,किरण शिरसाठ, भूषण जगताप, मनोहर बोरसे ,अनिल सेंदाणे,विजय बोरसे, भिका ठाकरे, मानव सेंदाणे,गोकुळ सोनवणे, यांचा सह समाज बांधव उपस्थित होते.







