जळगाव (प्रतिनिधी) – आषाढी एकादशीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते. यावर्षी कोरोनामुळे अनेकांची पंढरपूरवारी
बजरंग दल व जनमत प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून गरीब गरजूंना फराळाचे वाटप करुन आषाढी साजरी करण्यात आली. त्यांची माणसात देव शोधण्याच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत
आहे.
विश्व हिंदू परिषद बजरंग दल व जनमत प्रतिष्ठान कडून टंट्या भील वस्तीमध्ये दोनशे लोकांना साबुदाणा खिचडी व केळ वाटप करण्यात आले त्याप्रसंगी भारतीय महिला शिक्षक आघाडी अध्यक्षा शितलताई जडे व विश्व हिंदू परिषद बजरंग दल चे महामंत्री दीपक भाऊ दाभाडे राकेश भाऊ सोनार हर्षालीपाटील धर्मराज फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील सतीश महाजन व जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले उपस्थित होते
आषाढी एकादशीनिमित्त जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले कडून प्रेम नगर चौकामधील भाजी विक्रेत्यांना साबुदाणा खिचडी व केळे वाटप करण्यात आली त्याप्रसंगी बीजेपी युवा अध्यक्ष व मंडळ प्रमुख राहुल भाऊ लोखंडे. भारती शिक्षका महिला अध्यक्षा शितल ताई जडे, हर्षाली पाटील,पंकज नाले होते







