ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – खुनाच्या गुन्हयात जन्मठेप भोगत असलेला व पॅरोल रजेवरून परत कारागृहात हजर न होता फरार असलेल्या आरोपीतास अटक, दरम्यान पोलीस पथकावर या आरोपीताने कोयत्याने हल्ला केला. मात्र पोलिसांनी शिताफीने कारवाई करत त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, श्रीनगर पोलीस स्टेशन, ठाणे येथे गुन्हा रजि.नं. १३३/२०१५, भादवि ३०२, ३४ सेशन केस नं. ३७८/१५ या खुनाच्या गुन्हयात मध्यवर्ती कारागृह, ठाणे येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपीत नवनाथ विष्ण धांडगे हा दि. ०२/०४/२०२० रोजी पॅरोल रजेवर बाहेर आला होता. तो पॅरोल रजेचा कालावधी संपल्यानंतर दि. १७/५/२०२० रोजी कारागृहात हजर होणे आवश्यक होतो परंतु तो कारागृहात हजर न होता फरार झाला होता.
त्याबाबत मध्यवर्ती कारागृहातील पोहवा/राजाराम भानदास लहानगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे आरोपीत याचेविरूध्द गु.रजि.नं. २९४/२०२०, भादविसक २२४ प्रमाणे दि. ०५/०८/२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा गुन्हे शाखा, घटक–१, ठाणे येथे समांतर तपास करीत असताना इकडील घटकाचे पोहवा /५४१२ आनंदा भिलारे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्हयातील आरोपीत नवनाथ विष्णु धांगडे, वय-३५ वर्षे, राह. वरखंडे चाळ, रोड नं. २८, रामनगर, वागळे इस्टेट, ठाणे हा त्याचे घरी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या बातमीनुसार गुन्हे शाखा, घटक-१ चे अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा लावून त्यांस दि. ०९/१०/२०२० रोजी पहाटे ०५.०५ वा.चे सुमारास ताब्यात घेतले आहे. आरोपीत यास ताब्यात घेतांना आरोपीत याने त्याचेकडे असलेल्या कोयत्याने पोहवा/५४१२ आनंदा भिलारे व पोउपनिरी/दत्तात्रय सरक यांचेवर प्राणघातक हल्ला केला तरी देखील त्यांनी इतर स्टाफचे मदतीने त्यास पळुन जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले आहे.
सदर आरोपीताविरूध्द भादवि ३०७, ३५३, ३३३ सह आर्म अॅक्ट कलम ४, २५ प्रमाणे श्रीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला असुन सदर आरोपीतास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास श्रीनगर पोलीस स्टेशन करीत आहेत.
वरील कामगिरी मा. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सह आयुक्त सुरेश कुमार मेकला, अपर पोलीस आयुक्त प्रविण पवार, गुन्हे, पोलीस उप आयुक्त दिपक देवराज, गुन्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे (शोध-१) किसन गवळी, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-१, ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सपोनिरी/योगेश काकड, पोउपनिरी/सरक, पोहवा/आनंदा भिलारे, शिवाजी गायकवाड.. पोहवा/अबुतालीब शेख, पोना/ संजय बाबर, पोशि/गणेश बडगुजर, भगवान हिवरे, मपोशि/ निलम पाचपुते या पथकाने केली आहे.







