डिजिटल बुक मधील उपक्रम शिक्षकांसाठी प्रेरणादायी -अध्यक्षा ना.रंजनाताई पाटील

digital-book

”आपला जिल्हा -आपले उपक्रम ” डिजिटल बुकच्या भाग तीनचे प्रकाशन

 

 

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आपला जिल्हा आपले उपक्रम भाग तीन या डिजिटल बुक चे जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना ताई पाटील यांच्या दालनात प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी या ई -पुस्तकातील उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करत यातील उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद अध्यक्षा ना रंजनाताई पाटील यांनी केले.

 

 

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला जिल्हा आपले उपक्रम हे ई-पुस्तक तयार करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम लॉक डाऊन च्या काळात राबविण्यात आला होता .या पुस्तक प्रकाशन प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना ताई पाटील, उपाध्यक्ष श्री लालचंद भाऊ पाटील, शिक्षण व क्रीडा समिती सभापती श्री रवींद्र भाऊ पाटील,समाजकल्याण सभापती श्री जयपाल भाऊ बोदडे, श्री प्रल्हाद भाऊ पाटील, श्री राकेशभाऊ पाटील, श्री प्रमोद भाऊ सावकारे, श्री नाना भाऊ महाजन, श्री मधुकर भाऊ काटे, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री भाऊसाहेब अकलाडे ,प्रभारी उपशिक्षणाधिकारी श्री विजय पवार, प्रभारी उपशिक्षणाधिकारी श्री राजेंद्र सपकाळे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सरला पाटील, स्वीय सहाय्यक श्री पी आर चौधरी, श्री दिलीप पाटील, सौ कल्पना पाटील, श्रीमती अरुणा उदावंत, श्रीमती सोनाली साळुंखे, श्री संदीप पवार, श्री राहुल चौधरी, श्री सुनील दाभाडे, श्री प्रभात तडवी, श्री चंद्रकांत महाजन, श्री विलास निकम इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नव्याने प्रभारी उपशिक्षणाधिकारी पदी नेमणूक मिळाल्याबद्दल श्री विजय पवार व श्री राजेंद्र सपकाळे यांचा सत्कार करण्यात आला.सूत्र संचलन श्री संदीप पवार यांनी केले. प्रास्ताविक श्री विजय पवार यांनी केले. आभार श्री राजेंद्र सपकाळे यांनी मानले.

 

 

या उपक्रमासाठी पालक मंत्री ना. गुलाबराव जी पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष लालचन्द भाऊ पाटील तसेच शिक्षण सभापती रवींद्र भाऊ पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील , डायट प्राचार्या श्रीमती मंजुषा क्षीरसागर , माध्यमिक शिक्षणाधिकारी बी जे पाटील ,निरंतर शिक्षणाधिकारी के ए पाटील यांचे शुभेच्छा संदेश प्राप्त झाले आहेत. भाग तीन पुस्तकात शिक्षकांचे अभिनव उपक्रम समाविष्ट केलेले असून त्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने जिल्ह्यातील शिक्षकांकडून लॉकडाउनच्या कालावधीचा उत्कृष्टरित्या उपयोग करून घेतला व लेखन कौशल्य प्रोत्साहन दिले. खूप मोठा प्रतिसाद या उपक्रमाला मिळालेला आहे. डिजिटल बुक भाग तीन पुस्तकाच्या निर्मिती साठी पंकज पालीवाल, राजेंद्र कोळी ,श्रीमती सोनाली साळुंखे, रत्नाकर पाटील, श्रीमती विजया पाटील ,श्रीमती कल्पना पाटील , संदीप पवार , राहुल चौधरी , सुनील दाभाडे, मनोहर तेजवानी, अरुण पाटील, विलास निकम, ईश्वर महाजन इत्यादी शिक्षकांनी सहकार्य केले.तसेच जिल्ह्यातील सर्व उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here