केळवा सागरी पोलीस ठाणे येथे उच्च प्रतीची सी.सी.टी.व्ही. कॅमेरा यंत्रना उदघाटन

kelwa-cctv-system

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने केळवा सागरी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात उच्च प्रतीचे सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्याकरीता श्री.मानसिंग पाटील, प्रभारी अधिकारी केळवा सागरी पोलीस ठाणे यांनी केळवा परीसरातील नागरीकांना सुरक्षेचे महत्व पटवून देवुन जन सहकार्याच्या माध्यमातुन शितलादेवी मंदीर ट्रस्ट, केळवा शेतकी सोसायटी, केळवे पर्यटन विकास संघ, मिठागर सोययटी, कोळंबी प्रकल्प व्यवसायीक, तसेच इतर व्यवसायीक यांनी केलेल्या अमुल्य अशा सहकार्यातुन प्रकल्प कार्यान्वयीत करण्यात आला आहे.

 

 

 

सदर लोक सहकार्यातुन कार्यान्वीत केलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पामुळे समुद्र मार्गाने होणारे दहशतवादी/आतंकवादी हल्ले, तस्करी, संशयास्पद हालचाली, यांचेवर निगराणी. कोळंबी प्रकल्पातून मोठयाप्रमाणात होणान्या कोळंबी चोरीच्या बाबत होणारे दरोड, जबरी चोरी, चोरी या गुन्हयांवर नियंत्रण, तसेच अवैध जनावरे चोरी, वाहन चोरी करणारे गुन्हेगार यांचेवर नियंत्रण. केळवा बिच हे पर्यटनस्थळ असुन तेथे पर्यटकाकडुन होणारे गैरवर्तन व बेकायदेशिर कृत्य करणा-यांवर नियंत्रण तसेच हद्दीत घडणारे गंभीर गुन्हयांची उकल होण्यास मदत होणार आहे.

 

 

 

सदरचा प्रकल्प केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील टेंभिखोडावे, जलसार, विराथन बु’, मांजुर्ली फाटा, एडवण, मधुकर नगर नाका, अंबोडे, दांडाखाडी कस्टम हाऊस जवळ, जोगाळे नाका, केळवा बिच, शितलादेवी मंदीर परिसर, केळवा पुलनाका या सर्व ठिकाणी मिळुन ३२ उच्च प्रतीचे PTZ (360 अंशात फिरणारे) नाईट व्हिजन कलर HD व्हेरी फोकल असे कॅमेरे बसविण्यात आले असुन त्याचे दि.०८/१०/२०२० रोजी सायंकाळी ०५.०० वाजता मा.श्री. दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक सो, पालघर यांचे शुभहस्ते उद्घाटन कार्यक्रम पार पडला यावेळी मा.श्री. विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी साो, पालघर, मा.श्री. दशरथ पाटील, पोलीस निरीक्षक पालघर, श्री.जितेंद्र ठाकुर, सहा.पोलीस निरीक्षक, सातपाटी पोलीस ठाणे, शितलादेवी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. हेमप्रकाश तरडे, पंचम कोळंबी प्रकल्पाचे संचालक श्री. अजितसिंह पाटील, सौ.भावना किणी, सरपंच केळवे ग्राम पंचायत व इतर स्थानिक प्रतिष्ठीत नागरीक यांचे उपस्थीतीत कोरोनाच्या पार्श्वभुमिवर सामाजिक अंतर ठेवुन करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here