श्रीनगर पोलिसांकडून फरार आरोपींना शिताफीने अटक

dinkar-chandankar

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – श्रीनगर पोलीस स्टेशन गुरनं । 101/2020 भा.द.वि. कलम 302, 34 प्रमाणे मधील आरोपी निहार भालचंद्र बेलोसे (वय 22 वर्श राह, रुम न 501.सिध्देघर को.हौ.सोसायटी, चंदनवाडी, नौपाडा, ठाणे), आदित्य मिलिंद चौधरी (वय 25, राह. 06,श्रीराम स्मृती, भटवाडी, किसननगर नं 03, वा। ठाणे) यानी गुन्हा केल्यानंतर ते पळुन गेले होते व त्याचा शोध लागत नसल्याने व दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार असुन ते गुन्हा केल्यानंतर पळून गेले असल्याने त्यांना अटक करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते.
सदर गुन्हयांचा सहा. पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग पंकज शिरसाठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीनगर पोलीस ठाणे विजय शिंदे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेणे सुरु होता व त्यासाठी श्रीनगर पोलीस स्टेशन मार्फत खास पथक तयार केले होते.

 

 

 

दोन्ही आरोपी यांचा शोध घेत असताना त्यांचे मोबाईलचे टॉवर लोकेशन तपासले असता ते कांजुरमार्ग रेल्वे स्टेशनच्या परिसरातील येत असल्याची माहीती मिळाल्याने श्रीनगर पोलीस स्टेशनचे खास पथकाने कांजुरमार्ग रेल्वे स्टेशन येथे पोहचले व त्यांचा शोध घेत असताना दोन्ही आरोपी हे त्या ठिकाणावरुन पळुन जात असताना त्याचा पाठलाग करुन शिताफीने त्यांना ताब्यात घेतले तसेच त्यांना पोलीस ठाणे येथे आणून दोन्ही आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना दिनांक 07/10/2020 रोजी 17.00 वाजता गुरन, 1 101/2020 मध्ये अटक करण्यात आली आहे.
आरोपी निहार भालचंद्र बेलोसे याचेविरुध्द नौपाडा पोलीस स्टेशन येथे 02 गुन्हे, राबोडा पोलीस ठाणे 1 गुन्हा व वागळे पोलीस स्टेशन येथे 1 गुन्हा दाखल आहे तर आरोपी नामे आदित्य मिलिंद चौधरी याचे विरूद श्रीनगर पोलीस स्टेशन येथे 4 गुन्हे दाखल असून त्याचेवर सीआरपीसी 110 कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे.

 

 

 

 

वरील नमुद दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार असुन ते गुन्हा केल्यानंतर पळुन गेले असल्याने त्यांना अटक करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते. सदर गुन्हयांचा वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास करुन वर नुमद दोन्ही आरोपीतांना पोलीस आयुक्त. विवेक फणसळकर,.पोलीस सह आयुक्त डॉ. सुरेश कुमार मेकला, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे अनिल कुंभारे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5 वागळे इस्टेट ठाणे अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग पंकज शिरसाठ, सहा पोलीस आयुक्त वागळे इस्टेट विभाग प्रकाश निलेवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. विजय शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिनकर चंदनकर पोलीस निरीक्षक (प्रशा), सुनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश गोसावी, सहा.पो.उप निरीक्षक वाल्मिक मांढरे, पोलीस हवालदार/8008 माणिक इंगळे, पो हवालदार/6247 महेश मोरे, पोलीस नाईक/2224 वनपाल व्हनमाने, पोलीस नाईक/088 राजीव जाधव, पोशि/7183 धोंडे, पोशि/7695 कांगणे पोशि/2850 शेडगे यांनी शोध घेवुन व पाठलाग करुन आरोपीतांना ताब्यात घेवुन अटक केलेली आहे. अशा प्रकारे श्रीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी रेकॉर्डवरील सरति गुन्हेगारांना अटक करण्यासाठी मौलीक व भरीव कामगिरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here