लग्न समारंभात बॅन्ड वाजविण्यास बंदी नाही जिल्हाधिकारी अभिजित राऊत

band

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी) – येथे लग्न समारंभ बॅन्ड वाजविण्यास बंदी नाही तरी सर्वानी नियमांचे पालन करुन मास्क वापरून लग्न समारंभात बॅन्ड वाजविल्यास बॅन्ड पथकांना अनुमती राहिल असे आवाहन महाराष्ट्र बॅन्ड कलाकार संघटनेतर्फे जळगाव जिल्ह्य़ातील पदाधिकारी यांनी जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन चर्चा करुन निवेदन दिले असता राऊत यांनी अनुमती दर्शवली.

 

 

महाराष्ट्र बॅन्ड कलाकार संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शाम सदाशिव उपाध्यक्ष मोहन पाटील राजीव बोरसे. नीरज सोनवणे. नरेंद्र सोनवणे. महेंद्र सोनवणे. किशोर लोखंडे. अलिम मास्तर. राहुल पाटील. यासह पदाधिकारी डिस्ट्रन्स ठेवून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्याकडे लग्न समारंभात बॅन्ड वाजविण्यास परवानगी देऊन सहकार्य करावे व बॅन्ड कलावंतांचा उद्धार निर्वाहाचा प्रश्न दुर करावा व या सह विविध मागण्यांसाठी निवेदन देवून मागणी केली असता या वेळी जिल्हाधिकारी यांनी समाधानकारक चर्चा करून बॅन्ड वाजविल्यास अनुकूलता दर्शविली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here