अखेर मुंबईत वीज पुरवठा झाला पूर्ववत, मध्य आणि पश्चिम रेल्वे पुन्हा सुरू

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत आज सकाळी अचानक वीज पुरवठा ठप्प झाला होता. वीज ठप्प झाल्यामुळे मुंबईसह उपनगरामध्ये वीज पुरवठा खंडीत झाला होता. अखेर युद्धपातळीवर काम करून वीज पुरवठा हा सुरळीत करण्यात आला आहे.

 

 

 

आज सकाळी 10.10 च्या सुमारास मुंबईसह ठाण्यातील उपनगरांमध्ये वीज पुरवठा ठप्प झाला होता. मुंबई आणि उपनगरांमध्ये महावितरण, अदानी, बेस्टच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येत असतो. एकाच वेळी तिन्ही वीज पुरवठा कंपन्यांकडून सेवा खंडीत झाली होती. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. मुंबईतील दादर, लोअर परळ, वरळी, भांडुप, दादर आणि बोरिवली परिसरात अचानक वीज पुरवठा बंद झाला होता. त्यानंतर हळूहळू संपूर्ण मुंबई आणि ठाण्यात वीज पुरवठा खंडीत झाल्याचे समोर आले. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल, कार्यालयांमध्ये वीज नसल्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागत आहे. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वीज पुरवठा हा सुरळीत झाला आहे. ठीकठीक वीज पुरवठा हा पूर्ववत झाला आहे.

 

 

 

 

वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला होता. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ठप्प झाल्या होत्या. सर्व स्थानकांवर लोकल गाड्या गेल्या तीन तासांपासून जागच्या जागी थांबल्या होत्या. कुर्ला, दादर, डोंबिवली, कळवा स्थानकावर लोकल थांबलेल्या पाहण्यास मिळाल्या. त्याचबरोबर लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही याचा परिणाम झाला होता. मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या गाड्या स्थानकांवर थांबलेल्या होत्या.

‘महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होते. त्यावेळी सर्व भार हा सर्किट दोनवर टाकण्यात आला होता. मात्र, सर्किट दोनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला. अशी माहिती राऊत यांनी दिली.

 

 

 

 

‘महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होते. त्यावेळी सर्व भार हा सर्किट दोनवर टाकण्यात आला होता. मात्र, सर्किट दोनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे’ अशी माहिती राऊत यांनी दिली. तसंच, वीज पुरवठा अर्ध्या तासात सुरू होऊन जाईल, असं आश्वासनही नितीन राऊत यांनी दिले होते. अखेर मुंबईतील वीज पुरवठा हा पूर्ववत झाला आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here