अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखेतर्फे कै. मधुकर (अण्णा) देशपांडे यांना श्रद्धांजली

nashik

नाशिक (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विद्यमान संचालक, जेष्ठ निर्माते व वितरक कै. मधुकर (अण्णा) देशपांडे यांचे दिनांक१०/१०/२०२० रोजी निधन झाले.

 

 

आज दिनांक १२/१०/२०२० रोजी अ. भा. म. चित्रपट महामंडळाच्या नाशिक कार्यालयाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित श्री. शाम लोंढे, श्री. रवी जन्नावार, श्री.रमेश तलवारे, श्री. रवी साळवे यांनी देशपांडे यांच्या गत आठवनींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.

 

 

 

यावेळी उपस्थित कार्यकारणीसह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here