कर्मकांडाच्या थोतांडापेक्षा निस्वा:र्थी जनसेवा हीच खरी ईश्वर पुजा – प्रेमकुमार अहिरे

nisargmitra-jalgaon

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – कर्मकांडांच्या थोतांडापेक्षा नि:स्वार्थी जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असे प्रतिपादन निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे यांनी केले .कार्यालयात दिनांक ११ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या कोराना योद्धा सन्मान प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते .

 

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जिल्हा प्रवक्ते प्राध्यापक डॉ . प्रविणसिंह गिरासे असून प्रमुख अतिथी सर्वश्री आर .आर. सोनवणे, समितीचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष सुनील कापडणीस, कैलासवासी कविवर्य नीळकंठ महाजन स्मृती प्रतिष्ठानचे जळगाव माजी अध्यक्ष विजय लुल्हे, वृक्षमित्र शशिकांत शिंदे (सटाणा) आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी संस्थापक प्रेम कुमार अहिरे यांनी निसर्ग मित्र समितीने आजतागायत राबविलेले राज्य कार्यशाळा, शिबिरे, व्याख्याने यांचा संक्षेपाने अहवाल सादर करीत राज्यात संस्थेचा झालेला कार्यविस्तार सादर केला .त्यानंतर विजय लुल्हे मार्गदर्शन करतांना म्हणाले की ,” व्रतस्थ समाजसेवक पंकज नाले यांचा नि:स्वार्थी परोपकार हा कर्तव्य भावनेतून असल्याने तो संतांच्या जातकुळीचा असून त्याला अध्यात्माचा परिसस्पर्श लाभला आहे . ”

 

 

 

जनमत प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंकज नाले यांनी कोवीड महामारीच्या काळात जेव्हा रक्ताचे नातेवाईक तोंड लपवतात अशा परिस्थितीत निर्भय योद्ध्याप्रमाणे सतत चार महिने बेसहारा लोकांना दोन्ही वेळा 200 व्यक्तींना सकाळ – संध्याकाळ अन्नदान केले . एकूण चार जनजागृती आरोग्य शिबिरे घेतली . त्याचप्रमाणे जळगाव शहरातील सर्व शासकीय कार्यालये त्यांनी सॅनेटरायझेशन मोफत करून दिले . त्याचप्रमाणे जीवाची पर्वा न करता डॉक्टर ,पोलीस, शिक्षक यांनी चोवीस तास सेवा करून अतुलनीय कार्य केले अशा तब्बल चारशे सेवाव्रती मंडळींना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले . nisargmitra-jalgaon-1

 

 

 

कोरोना योद्धा प्रमाणपत्राचा या अनोख्या प्रयोगाची सुरुवातीला थट्टा झाली ! मात्र हाच प्रयोग नंतर महाराष्ट्रात ऑयडॉल ठरल्याने अनेकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श गिरवला . नाले यांच्या व्यापक व कालसापेक्ष समाजकार्याची माहिती लुल्हे यांनी सांगून नालेंची मुक्तकंठाने प्रशंसा केली . पंकज नाले यांच्या अतुलनीय व्रतस्थ समर्पित कार्याची विशेष दखल घेऊन निसर्ग मित्र समिती, धुळे तर्फे कोरोना योद्धा सन्मानपत्र समितीचे जिल्हा प्रवक्ते डॉ .प्रविणसिंह गिरासे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आले . या प्रसंगी संस्थापक प्रेमकुमार अहिरे यांनी नाले यांना वृक्षदान करीत संस्थेने महिलादिना निमित्ताने प्रकाशित केलेला विशेषांक , शिवरायांचे आज्ञापत्र देऊन कार्याला शुभेच्छा दिल्या .

 

 

 

अध्यक्षीय भाषणात डॉ . प्रविणसिंह गिरासे यांनी थोर संतांचे पर्यावरण विषयक विचार मांडले .तसेच स्वामी विवेकानंद यांनी युवा पिढीला दिलेली कालातीत संजीवक राष्ट्रीय मूल्ये सोदाहरण सांगितली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अहिरे यांनी केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here