संघर्ष प्रतिष्ठान व दिपकसिंग राजपूत मित्र मंडळाचा उपक्रम
चाळीसगाव (प्रतिनिधी) – कोरोनाचा कहर चाळीसगाव तालुक्यात सुरू असताना आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रूग्णांना होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप व रुग्णांना मार्गदर्शन करणाऱ्या कोरोना योध्यांचा सत्कार संघर्ष प्रतिष्ठान व दिपकसिंग राजपूत मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने दि 11 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील जामडी येथे करण्यात आला.
याप्रसंगी आमदार मंगेश दादा चव्हाण वाघळी पंचायत समिती गटाचे सुभाष पैलवान पातोंडा गटाचे संजय भास्कर पाटील जिल्हा परिषद सदस्य तात्यासो पोपट तात्या भोळे, विजय पहिलवान.विश्वास फुलचंद परदेशी विठ्ठल आप्पा परदेशी नंगीनचंद जैन उपस्थित होते.
चाळीसगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतांना तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी गोरगरीब जनतेला जेवण दिले तर होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप देखील केले तसेच भाजपचे तालुका अध्यक्ष प्रा सुनील निकम यांनी होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप केले तर डॉक्टर हर्षदा पाटील, डॉक्टर सुजाता राजपूत,पोलीस पाटील सोनल रायसिग परदेशी, विजय दाभाडे mpw, अंगणवाडी सेविका दीपमाला जेवरास, अंगणवाडी सेविका आश्विनी लक्ष्मण परदेशी, आशासेविका वैशाली किशोर पाटील, मदतनिस साजिदा बी शेख अनवर, मदतनिस जिजाबाई रामसिग ठाकरे,प्रा शिक्षक दाभाडे सर, उर्दू शाळेतील शिक्षक रऊप सर यांनी देखील कोरोना काळात रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना तात्काळ मदत केली अशा कोरोना योध्यांचा सत्कार जामडी येथे करण्यात आला.
सुत्रसंचालन विनोद गोपालसिग परदेशी सर यांनी केले यावेळी संघर्ष प्रतिष्ठानचे सदस्य, तसेच दिपकसिग राजपूत, शरीफ शेख फकीरा, रायसिग परदेशी, संजय परदेशी, जाबीर कुरेशी, लुकमान शहा, विजय पहिलवान, विठ्ठल शंकर परदेशी, बाजीराव पाटील, आप्पा पाटील, अरुण जाधव, प्रदिप परदेशी, विजय चुगडे, देवसिग परदेशी, शेरसिग राजपुत, आदी उपस्थित होते कार्यक्रमासाठी अधिक परिश्रम संघर्ष प्रतिष्ठान व दीपक सिंग राजपूत मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य व ग्रामस्थ यांनी घेतले.







