दरेगाव बनले व्यासनमुक्ती शिबिराचे केंद्र; व्यसनमुक्ती शिबिराला अनेक नागरिकांनी घेतला सहभाग

daregaon-vayasanmukti

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद तालुक्यातील दरेगाव येथे सलग चार आठवडय़ापासून दारु व्यसनमुक्ती शिबीराचे आयोजन करण्यात येत आसूण नागरिकांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. ११ ऑक्टोबर  रविवार रोजी सकाळी १० वाजता व्यसनमुक्ती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.खुलताबाद तालुक्यातील डोंगर दऱ्यात वसलेले दरेगाव हे जिल्ह्यात एक आदर्श निर्माण करून देत आहे.

 

 

 

 

दरेगाव  हे व्यसनमुक्त होण्यासाठी गावातील तरुणांनी कंबर कसले आहे.सलग चार आठवड्यापासून व्यसनमुक्ती शिबीराचे आयोजन करून आपल्या मित्रांना दारू पासून अलिप्त करण्यास सुरुवात केली. दरेगावतील अनेक मित्रांनी आतापर्यंत दारू सोडली व आम्ही यापुढे दारू पिणार नाही हे ते छातीठोकपणे सांगत आहेत.जर हि उपचार पद्धती काही दिवस अशीच सुरु राहिली तर दरेगाव हे एक आदर्श व्यसनमुक्त गाव म्हणून नावारूपास येईल अशी चर्चा  आजूबाजूच्या गावातील नागरिकांच्या तोंडून ऐकाला मिळत आहे.  दरेगावात व्यसनमुक्ती शिबिर आयोजित केल्यामुळे आजूबाजूच्या गावलाही याचा फायदा होत आहे, खूप दुरून दुरून लोक या शिबिरासाठी येतआहे. आपण खरोखर व्यसनमुक्त होऊ शकतो असा  विचार करून आतापर्यँत दरेगाव येथील व्यसनमुक्ती शिबिरात, पाडळी, सोबलगाव, कनकशिळ, बाजार सावंगी, वाहेगाव, भोकनगाव, खुलताबाद, कन्नड, लासुर स्टेशन, उपळी, डोंगरगाव कवाड,शेरोडी, पिरबोवडा,पिशोर, जवखेडा, बाभूळगाव, भारंबा वाडी,माळेगाव ठोकळ, वानेगाव, चाळीसगाव, शिर्डी, तसेच अनेक गावातील लोकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला.

 

 

 

 

 

डॉ कृष्णा भावले सरांनी सुरु केलेल्या सारा फाऊंडेशन च्या माध्यमातून ” दारू मुक्त घर, दारू मुक्त गाव” या अभियानात अनेक जणांनी भाग घेऊन व्यसनमुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अनेकांचे संसार रस्त्यावर येण्याच्या अगोदरच व्यवस्थित चालु होत आहे. प्रत्येक व्यसनी मित्राला वाटते आपण व्यसन करायला नाही पाहिजे, पण नाईलाजाने व्यसनाची सवय लागली, पण कुणीतरी मला व्यसनमुक्त करायला पाहिजे अशी त्यांची जी एक अपेक्षा होती,ती या शिबिराच्या माध्यमातून पूर्ण होतांना दिसत आहे. या अगोदर दरेगाव येथे अनेक जणांनी या शिबिरात व्यसनमुक्त होण्यासाठी समुपदेशन व उपचार करून घेतले व त्यांना त्याचा परिणाम जाणवू लागला,काही लोकांना तर विश्वास बसत नव्हता की खरंच ४८ तासात  आमची दारू सुटेल, ते डॉ.साहेबांना म्हणाले की तुम्ही काही जादू तर नाही करत, इतकी प्रभावी उपचार पद्धती ,औषधी, समुपदेशन डॉ कृष्णा भावले सरांनी आतापर्यंत व्यसनमुक्ती शिबिरात केले.

 

 

 

 

 

खरंच आपण दारूपासून मुक्त होऊ शकतो, हे त्यांच्या लक्षात आले,  ज्या लोकांनी दारू पिणे सोडली ,किंवा सोडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत अशा लोकांनी स्वतः च्या मित्रांना पण दारू सोडण्यासाठी शिबिरात सहभागी होण्यास सांगितले.दरेगावतील अनेकांनी आपल्या नातेवाईकांना या व्यसनमुक्ती शिबिरात सहभागी करून घेतले. व्यसनमुक्तीची(दारुमुक्त) हि एक छोटीशी ठिणगी पडली भविष्यात या ठिणगीचे रूपांतर मोठ्या आगीत होण्यास वेळ लागणार नाही,  हे व्यसनमुक्ती शिबिराला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादावरून दिसुन येते.

 

 

 

 

 

दरेगावतील सर्व नागरिकांनी , ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, सर्वपक्षीय नेते, गावातील तरुण यांनी आपले गाव व्यसनमुक्त होण्यासाठी,आपल्या मित्रांना मुलांना, भावांना, काकांना, वडिलांना, दारूचे व्यसन सोडण्याकरिता व्यसनमुक्ती शिबिरात सहभागी करून घेतले.आपल्यामुळे कुणाचा संसार सुखाचा होऊ शकतो, एखाद्या माय माऊलीचे कुंकू आपण वाचवू शकते, मुलांना पहिल्यासारखा व्यसनमुक्त बाप मिळवून देऊ शकतो, महिलांना व्यसनमुक्त नवरा मिळू शकतो, अशी एक सामाजिक भावना समजून, कोणताही स्वार्थ नसतांना हे व्यसनमुक्ती शिबिर यशस्वी होण्यासाठी दरेगावच्या सरपंच जयश्री गणेश बोर्डे, कल्पतरु बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड, माजी सरपंच अशोक गायकवाड, साहेबराव आण्णा, काकासाहेब गायकवाड, राजू गायकवाड, गणेश बोर्डे, गोकुळ ग्रॅण्डवाल, बाबासाहेब गायकवाड, रामदास गायकवाड, दासू गायकवाड,रोहिदास घोलप, आयुब शहा, सेतू सेवा केंद्राचे गणेश गायकवाड व गावातील अनेक तरुणांनी व नागरिकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here