खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी व ग्रामीण परिसरातील शेतकऱ्यांचे दोन लाखाची माफी व नियमीत कर्ज भरणाऱ्याना सरकारकडून घोषित प्रोत्साहनपर अनुदानाचे काहीच होत नसल्याने शेतकरी बँका, सोसायटी व उपनिबंधक कडे हेलपाटे मारून मारून वैतागले असल्याचे चित्र आहे.
सरकारकडून कर्जमाफी नंतर दोन लाख कर्ज मुक्तीची विचाराची सरकारने घोषण केली तर तद्नंतर नियमीत कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची विचारात्मीक घोषणा सरकारने केली होती. परंतु अद्याप पर्यंत काहीच होत नाही व झाले नाही. मात्र घोषणे मुळे शेतकरी आशादायी झाला. व त्यासाठी शेतकरी, बँकेत, सोसायटीत चेअरमन, सचिव, उपनिबंधक कडे निवेदन देत हेलपाटे मारून मारून हात टेकले आहे. पण त्याचे स्पष्ट होत नसल्याने शेतकरी संभ्रमीत झाले आहे.
वचित शेतकरी आशा लावून बसला आहे. त्यात यंदा निसर्गाने शेतकऱ्यांना अतिवृष्टी मुसळधार सततधार पावसाने त्रस्त व परेशान करुन सोडले आहे. त्यामुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. व तेही नुकसान शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसली आहे. त्यात सरकार मदतीला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांनी जीवन कसे जगावे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांत समोर उभा आहे. यास सरकारने गंभीरतेने घेवून तातडीने दोन लाखची माफी, नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर आनुदान बाबत विचार करून निर्णय घ्यावा असी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.







