महिलांच्या सुरक्षिततेसाठी SOP बनविण्यात यावी,तहसीलदारांना निवेदन.
खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.राज्यातील काही कोविड सेंटर व कोविड 19 हॉस्पिटलमध्ये विनभंग व बलात्काराचे प्रकार घडले आहेत.मात्र याबाबत शासन कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याबद्दल सोमवार रोजी भाजपा महिला आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन होत असुन खुलताबाद येथे तहसील कार्यालयासमोर भाजपा महिला आघाडीच्या वतीने राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.व या बाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट मोठे आहे.तर दूसरीकडे कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी हॉस्पिटल व कोविड सेंटरमध्ये महिला ही दाखल आहेत.गेल्या काही दिवसात अशा काही ठिकाणी अत्याचार, विनयभंग, बलात्कारच्या घटना घडल्या.या घटना संतापजनक आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.याचा निषेध म्हणून सोमवार रोजी भाजपा महिला आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलन करुन निषेध व्यक्त केले जात आहे.संपूर्ण महाराष्ट्रमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव तीव्र राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे.तरी महिलांसाठी त्वरित SOP बनविण्यात यावी.अशी मागणीचे निवेदन महिला आघाडीच्या वतीने खुलताबाद येथील तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी पंचायत समिती उपसभापती सौ. रेखाताई प्रकाश चव्हाण, माजी उपसभापती तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य अर्चना दिनेश अंभोरे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुनीता दिवेकर,महिला शहराध्यक्ष मा. लिलाबाई बारगळ, तसेच पं.स सभापती गणेश अधाने, तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, शहराध्यक्ष सतिष दांडेकर,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राहुल निकुंभ,सुखदेव पाटील,ज्ञानेश्वर पाटील बारगळ, नगरसेवक परसराम बारगळ, माजी उपसभापती दिनेश अंभोरे,अविनाश कुलकर्णी,गणेश हजारे,राहुल हजारे, शेख अनिस,सागर मातकर,बाबासाहेब वाकळे,आदी सह मोठ्या संख्येने माता-भगिनी व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.







