कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा “शारदीय नवरात्र महोत्सव” रद्द

kultabad-durga-mahostav

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – तालुक्यातील बाजारसावंगी येथील दर वर्षी व नियोजीत 17 ऑक्टूबर चा रेणुका माता मंदिर येथील ‘शारदीय नवरात्र महोत्सव ‘कोविड -19 मुळे कार्यक्रम विश्वस्त मंडळा कडून रद्द ठरवण्यात आले असूण तसे पत्रकही काढण्यात आले आहे.

 

 

 

प्रसिद्ध व जागृत दैवत रेणुका माता मंदिर येथे प्रत्येक वर्षी ‘शारदीय नवरात्र महोत्सव ‘मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. उपवास, पुजा अर्चा, आरती साठी पुर्ण गाव एकत्रीत येवून ‘नवरात्र महोत्सव’ साजरा करण्यात येतो. परंतु यंदा कोरोनाचे संकट असल्याने शासन तथा प्रशासन कडून महोत्सव साजरे न करण्याचे सक्तीचे आदेश आहे. kultabad-durga

 

 

 

महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने महिला – पुरुष, तरूण – तरुणी, वृध्द भाविक भक्त मोठ्या संख्येने गर्दी करतात. गर्दी टाळण्यासाठी महोत्सव रद्द करण्यात आला आहे. रेणुका माता मंदिर विश्वस्त अध्यक्ष भिकनराव घुले पाटील, सचिव काशिनाथ नलावडे, पुजारी गुरु बाळासाहेब मुळे यांनी तसे पत्रक काढून प्रसिद्धीस दिले आहे. त्यामुळे भावी भक्तात मोठी नाराजी पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here