पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवी वैद्य यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकलीच्या हस्ते अन्नदान

ravi-vaidya

मुंबई (प्रतिनिधी अमोल माने) – पोलिसांच्या मुलांना 5% टक्के आरक्षण मिळवून देणारे पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक रवि ना वैद्य यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई कार्यालय येथे पोलीस बॉईज असोशियन ची लाडकी प्राप्ती विनोद निषाद हिच्या हस्ते गोरगरीब ,बेघर लोकांना अन्नदान व मास्क चे वाटप करण्यात आले सदर अन्नदान वाटप कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून घाटकोपर चे लाडके शिवसेनेचे नगरसेवक किरण ज्योतिराम लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना कालखंडामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या समाजसेवक ,यांना कोरोना योद्धा गौरव 2020 ने सन्मानित करण्यात आले श्री वैद्य यांचा वाढदिवस साजरा करताना कोणत्याही प्रकारे केक न कापता समाजातील गरीब गरजू लोकांना अन्नदान वाटप करून एक वेगळा संदेश समाजामध्ये देण्यात आला

 

 

 

 

श्री वैद्य यांचा वाढदिवस साजरा करताना त्यांना भेट म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली श्री वैद्य हे औरंगाबादला असल्याकारणाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वाढदिवसाला उपस्थित राहणे शक्य नाही त्या अनुषंगाने त्यांना वाढदिवसाची छत्रपती शिवाजी महाराज फोटो फ्रेम चे अनावरण महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष श्री सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले सदर छत्रपती महाराज यांच्या फोटोचे फ्रेम ही आझाद युथ स्टूडेंट ट्रस्ट राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राजकुमार यादव यांच्यामार्फत श्री रवी वैद्य यांना देण्यात आली आहे.mumbai-2

 

 

 

 

सदर वाढदिवस हा निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मा श्री धीरज पार्सेकर ,मा श्री सुशील मोरे निवड समिती कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार प्रदेश अध्यक्ष मा श्री अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रकाश शेरे मुंबई अध्यक्ष यांच्या कार्यालय येथे मोठ्या उत्साहाने साजरा करून या कार्यक्रमाला मुंबई सरचिटणीस अमोल पटेकर मालाड अध्यक्ष विनोद वाघमारे , आदेश गायकवाड व इतर शहरातील ठाणे पनवेल मुंबई पदाधिकारी सदस्य यांनी वाढदिवसाला भेट देऊन मा श्री रवी वैद्य यांना बुलंद पोलीस टाइम्स्‌तर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या.police-boys-association

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here