ठाणे (प्रतिनिधी सिध्दार्थ जाधव) – राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉक्टरांइतकेच प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले. त्यामुळेच डॉक्टरांपाठोपाठ पोलिसांनाही कोरोनाचा सामना करावा लागला. त्यामध्ये १३ हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाने ग्रासले, तर शंभरहून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला. असे असतानाही पोलिसांकडून कोरोनाविरुद्धची लढाई थांबली नाही. कोरोना रोखण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनी खाकीतील माणुसकी दाखवत आता प्लाझ्मादानासाठी पुढाकार घेतला आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस हवालदार प्रकाश शिरसाठ यांच्या पत्नी श्रीमती जयश्री शिरसाठ यांना प्लाझ्माची गरज असल्याचे समजताच शीळ डायघर ठाणे येथील पोलीस कर्मचारी दिपक जाधव यांनी त्यांचा प्लाझ्मा देऊन त्यांना मदत केली.
दीपक जाधव यांनी तात्काळ मदत करून प्लाझा दान केल्याबद्दल यांच्या खाकीतील माणुसकीला बुलंद पोलीस टाइम्सतर्फे सलाम!







