अलिबागच्या कलाकारांचा देवी चरणी जागर, घालतोय गोंधळ वाजवूनी संबळ

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना व्यवसायिक , नोकरदार , कामगारांची बराच काळ थांबलेली चक्र हळू हळू का होईना पण रुळावर येऊ लागलीत… पण या साऱ्यांच्यात अजुनही प्रतिक्षेत आहे….. तो सच्चा कलाकार….
नवरात्र उत्सव म्हणजे लाखो कलाकारांचा हंगाम…. अगदी गावातल्या हौशी ढोलकी वजवणाऱ्यांपासून  ते चॅनेल वरच्या व्यवसायिक गायकांपर्यत. या साऱ्यांनाच कलाकार म्हणून सन्मान आणि आर्थिक सबलता नवरात्र उत्सवातल्या वाद्यवृंद , दांडिया , जागरण-गोंधळ या कार्यक्रमांमधून मिळते… पण आज कोरोनाचं सावट या उत्सवावर आहे… आज कलाकार वाट पाहतोय… कधी ढोलकीवरची धूळ उडेल….? गायकाचा स्वर निनादेल…..? प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट होईल….? सारेच प्रश्न…..

 

 

 

 

 

हे सारं भयानक वास्तव असताना सुद्धा गप्प बसेल तो कलाकार कसला…. म्हणून साऱ्या कलाविश्वाला आत्मिक बळ देण्यासाठी…. एक सकारात्मक उर्जा तयार करण्यासाठी… प्रत्येक कलाकाराची आर्त हाक महिषासूर मर्दीनी पर्यंत पोहोचविण्यासाठी…. आता घुमणार आहे ” संबळ ” .
“बास कर प्रोडक्शन्स” अलिबाग मधल्या स्थानिक ठराविक कलाकारांना सोबत घेऊन युट्युबच्या माध्यमातून मातेच्या नावानं जागर-गोंधळ घालण्यासाठी… आई अंबाबाईच्या चरणी सादर करतोय एक पारंपरीक नजराणा ” संबळ ” लवकरच बास कर प्रोडक्शन्स च्या अधिकृत चॅनेलवर प्रसारित करण्यात येणार आहे..

 

 

 

 

याची संकल्पना आणि वादक कु.अक्षय मंगेश म्हात्रे.गायक. अपर्णा पाटील श्रेया पाटील  .विशाल अभंगे.मयुर पाटील .गौरव राऊळ, वादक.अक्षय म्हात्रे .लाभेश पाटील.प्रतिक वैते. प्रतिक नाईक, आशुतोष पोटे.दर्शन नाईक.विराज म्हात्रे. कॅमेरा :- अमेय पाटील.मयुरेश सवतीरकर.मनाली देशमुख. निवेदक:-आनंद पाटील.प्राजक्ता पाटील.तेजस म्हात्रे.प्रतिम सुतार. कीर्ती घासे. एडिटर :-केदार शिर्के. दिग्दर्शन :-संदेश मयेकर. संगीत संकलन:-रितेश घासे. सहाय्यक:-अर्पिता जाधव.वेदान्त जाधव. कॅमेरा :- अमेय पाटील.मयुरेश सवतीरकर.मनाली देशमुख. निवेदक:-आनंद पाटील.प्राजक्ता पाटील.तेजस म्हात्रे.प्रतिम सुतार. कीर्ती घासे. एडिटर :-केदार शिर्के. दिग्दर्शन :-संदेश मयेकर. संगीत संकलन:-रितेश घासे . सहाय्यक:-अर्पिता जाधव.वेदान्त जाधव यांचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here