शिरपूर (प्रतिनिधी प्रशांत वाकडे (वरुळ)) – नुकतेच अहमदनगर येथुन सहाय्यक जिल्हा पुरवठा आधिकारी म्हणून कार्यरत असलेले सुनील सैंदाणे हे शिंदखेडा तहसीलदार म्हणून नियुक्तीवर आले आहेत. आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे त्यांचे आज (दि.१२) स्वागत व सत्कार करण्यात आला. स्वागत कार्यक्रमानंतर टोकरे,महादेव,मल्हार,ढोर ह्या जमातीच्या समस्यांबाबत निवेदन ही देण्यात आले.
या वेळी समाज बांधवांशी त्यांनी दिड तास चर्चा केली व ह्या चर्चेत त्यांनी माझ्या परीने तुम्हाला जी मदत लागली ती करण्यास तयार आहे व सर्व सामान्य नागरिकांना त्यांचे ”हक्क आणि आधिकार मिळवुन देण्यात सदैव कार्यतत्पर राहीन, असे आश्वासन दिले.
या वेळी गिरधर महाले राज्य कार्यकारीणी सदस्य, दिलीप बागुल कार्याध्यक्ष खांदेश विभाग, रविभाऊ शिरसाठ उपाध्यक्ष खांदेश विभाग, हिरालाल वाकडे अध्यक्ष धुळे जिल्हा, भैयासाहेब कोळी समन्वयक धुळे जिल्हा, नितिन सावळे उपाध्यक्ष नंदुरबार जिल्हा, अमोल निकुमे उपाध्यक्ष, युवा आघाडी धुळे जिल्हा, संदिप येळवे अध्यक्ष युवा आघाडी शिंदखेडा तालुका, प्रशांत वाकडे उपाध्यक्ष युवा आघाडी शिरपुर तालुका, हेमराज बोरसे संपर्क प्रमुख, युवा आघाडी शिंदखेडा तालुका, राहुल ईशी समन्वयक, युवा आघाडी शिंदखेडा तालुका, संदिप कोळी अध्यक्ष, दोंडाईचा शहर, साहेबराव कोळी धुळे, धनराज शिरसाठ जातोडा, भुषण कुवर देगाव, दिलीप शिरसाठ, सहसचिव धुळे जिल्हा, जयवंतराव सुर्यवंशी, सल्लागार धुळे जिल्हा, सौ.कल्पनाताई बोरसे अध्यक्षा महिला आघाडी धुळे जिल्हा, सौ.सोनालीताई अखडमल उपाध्यक्षा महिला आघाडी धुळे जिल्हा, सौ.जयश्रीताई शिरसाठ सचिव, महिला आघाडी धुळे जिल्हा आदी उपस्थित होते.







