दिंनदयाल नगर मधील अतिक्रमणाबाबत बातमी प्रसिध्द केल्याचा आला राग
शहादा (विजय निकम) – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील दिनदयाल नगर मधील अतिक्रमणाबाबतची तक्रार स्थानिक रहिवासी महिला व सोसायटीचे चेअरमन यांनी दिली होती. यासंदर्भाची बातमी प्रसारित केली म्हणून मजूर मंडळ अधिकाऱ्याने पत्रकारांना धमकी देत प्रशासन पाठीशी असून माझे कोणी काही करू शकत नाही असे स्पष्ट केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील दीनदयाल नगर भागात अक्षय अमृतकर याच्या घराचे बांधकाम सुरू असून हे बांधकाम अनधिकृत असून अतिक्रमणात बांधकाम करण्यात आले अशी तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे.हा प्लॉट पूर्व-पश्चिम असतांना बांधकाम मात्र उत्तर-दक्षिण करण्यात आल्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. परंतु प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील आपल्या अधिकाराचा वापर करून तसेच स्थानिकांवर दबाव आणून ते काम तसेच सुरू आहे.याबाबत बातमी प्रसारित केल्याचा राग येऊन पत्रकारांना बोलून त्यांना धमकावण्याचा प्रकार या अधिकाऱ्याने केला आहे.
तुम्ही मला ओळखत नाही ,माझे तीस वर्षात कोणी काही करू शकले नाही, मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने हॅन्डल करू शकतो ,या आशयाचे वक्तव्य संबंधित अधिकाऱ्याने पत्रकारांशी केले आहे.आजपर्यंत माझ्याविरोधात एकाही पत्रकाराने बातमी प्रसारित करण्याची हिंमत केली नाही व करणार नाही अशा प्रकारचा दम त्यांनी पत्रकारांना दिला आहे. यावरून अधिकाऱ्याने प्रशासनाची चांगलीच हितसंबंध जोपासले आहेत व स्थानिक रहिवाशांना व महिलांना त्रास देऊन आपले काम सुरळीतपणे त्यांनी सुरु ठेवले आहे. संबंधित मंडळ अधिकारी मुजोरपणा करीत असून शहरातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी संधान साधून पत्रकारांना सरळ करण्याची भाषा करत आहे. सदर मंडळाधिकारी यांनी दिलेली धमकी चा व्हिडीओ पत्रकारांकडे उपलब्ध असून जर त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी मंडळ अधिकारी जबाबदार असतील.याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. लोकशाही राष्ट्रात पत्रकार चौथा स्तंभ मानला जातो परंतु काही अधिकारी त्याचा गैरवापर करीत पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत त्याचाच प्रत्यय शहरातील काही इमानदार पत्रकारांना येत आहे.
दिनदयाळ नगर मधील अतिक्रमणाबाबत नगरपालिकेने संबंधितांना नोटीस दिली असून स्थानिक कारवाईची वाट पाहत आहेत. गेल्या आठ महिन्यापासून स्थानिक रहिवासी महिला तक्रार करीत असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. मला विचारल्याशिवाय आपण बातमी टाकू शकत नाही,तसेच मी तुम्हाला बजावले होते ही बातमी लावायची नाही तरी आपण बातमी लावली त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल या आशयाचे वक्तव्य देखील या महाशयांनी केली आहे.तरी संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्यात येऊन संबंधितांना न्याय मिळत नाही तोपर्यंत पत्रकार म्हणून आम्ही बातमी चा पाठवा पुरावा करणारच तसेच कुठल्याही धमकीला भीक घालणार नाही .असे मत पत्रकारांनी व्यक्त केले आहे.







