शहादा (विजय निकम) – शहादा शहरातील महापुरुषांचे पुतळे स्वच्छ करून धम्मचक्र परिवर्तन दिवस साजरा करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन भीम आर्मी शहादा यांच्यातर्फे मुख्याधिकारी यांना करण्यात आले आहे.
येत्या 14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र परिवर्तन दिवस असून त्याचे औचित्य साधून शहरातील महापुरुषांचे पुतळे स्वच्छ धुऊन साफ करण्यात यावेत.महाराष्ट्रात सर्व जाती-धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्छा देऊन धम्मचक्र परिवर्तन दिवस म्हणून साजरा करतात तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतात.
तरी या वर्षी शहादा नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व महापुरुषांचे पुतळे दोन परिसराची साफसफाई करण्यात यावी.चमक चक्र परिवर्तन दिवसाच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले महात्मा गांधी विर एकलव्य महाराणा प्रताप या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे साफसफाई व परिसराची साफसफाई करून हा दिवस साजरा करण्यात यावा अशी मागणी भीम आर्मीचे शहादा तालुका अध्यक्ष राहुल आगळे यांनी केली आहे.








