मंदिरे तात्काळ उघडावीत या मागणीसाठी पैठण येथे भाजपाचे आंदोलन
पैठण (प्रतिनिधी) – धार्मिक स्थळे मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीकरिता भाजपा जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण संभाजीनगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाभरात करण्यात येत आहे.
यावेळी पैठण तालुका/शहर भाजपाच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण करून या राज्य सरकारच्या निषेध करण्यात आला. याप्रसंगी प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ.रेखाताई कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस श्री.लक्ष्मणराव औटे,तालुकाध्यक्ष डॉ.श्री.सुनील शिंदे,जिल्हा किसान मोर्चा प्रमुख श्री.कल्याण गायकवाड, जिल्हा युवा प्रमुख सूरज लोळगे यांच्यासह शहर-तालुक्यातील भाजपा प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.
संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू आणि मंदिर बंद असे काळे चित्र उभे केले आहे या काळ या निर्णयाविरोधात आणि मंदिर तातडीने उघडावी त्या मागणी करता महाराष्ट्रातील प्रमुख धर्माचार्य साधूसंत अनेक धार्मिक संघटना एकत्र येत अध्यात्मिक आघाडी भाजप नेतृत्व राज्यव्यापी उपोषण महाराष्ट्र राज्यात सुरू आहे.







