खुलताबाद येथील बावीस ख़्वाजा दर्गा समोर भाजपाचे आंदोलन

khultabad-bjp

धार्मिक स्थळे उघडावे याकरिता भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन

 

 

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वागळता इतर सर्व सेवा, व्यवहारांवर बंदी घालण्यात आली. यामध्ये मंदिरांचाही समावेश आहे.

 

 

 

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील मंदिरे बंद आहेत. राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन (Mission Begin Again) अंतर्गत आतापर्यंत अनेक उपक्रमांना संमती दिली आहे. त्याच प्रमाणे राज्यातील मंदिरे उघडण्यात (Temple reopen) यावी अशी मागणी जोर धरत आहे. या मागणीसह मंगळवारी भारतीय जनता पक्षाकडून संपूर्ण जिल्ह्यात लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं.याप्रसंगी खुलताबाद येथे भाजपा अल्पसंख्यक मोर्चेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

 

 

 

राज्य सरकारने नियमांत शिथिलता आणत अनेक व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अद्यापही मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाहीये. त्यामुळे भाजपकडून धार्मिक स्थळे व मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी जिल्ह्याभर आंदोलन करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलेल्या या लाक्षणिक आंदोलनात भाजपचे नेते, कार्यकर्ते यांनी धार्मिक स्थळांसमोर येऊन आंदोलन केलं. khultabadbjp

 

 

 

धार्मिक स्थळे उघडण्याच्या मागणीसाठी खुलताबाद येथील बावीस ख़्वाजा दर्गा परिसरात खा.डॉ भगवत कराड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.यावेळी खा.डॉ भगवत कराड यांच्यासह भाजपा अल्पसंख्यक मोर्चा तालुकाध्यक्ष सत्तार पटेल,मुक्तार पठान ,व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.bjp-khultabad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here