रोजगार हमी योजनाचे कामे भिल्ल समाजाच्या महिला मजूरांना देण्याची मागणी

khultabad-rojgar-hami-yojan

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथील रोपवाटिकेत भिल्ल समाजातील काही महिलांना रोजगार हमी योजने अंतर्गत काम मिळत नसल्याने महिला कामगारांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

 

 

 

 

निवेदनावर म्हटले आहे की, खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथील एका रोपवाटिकेमध्ये गेल्या पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळापासून रोजगार हमी योजना अंतर्गत कामाला जात असुन वनविभागाचे चौकीदार सांगतात की आता काम बंद आहे.मस्टर निघालेले नाही असे अनेक वेगवेगळे कारणे देता.आणि गावातील इतर महिलांना काम देतात.तर मस्टर नसतांना काम कसा काय चालते.त्याची चौकशी करावी.तसेच संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी.अन्यथा आम्ही आमरण उपोषणाला बसु.

 

 

 

 

या अगोदर ह्या गोष्टी घडलेल्या नाही.व आम्हाला काम पण मिळत नाही.आमच्या भिल्ल समाजाच्या महिलांचा मस्टर निघालेले असताना आम्हाला ते बाहेर हकलून देता आम्हाला काम देत नाही.सांगतात की तुमचे मस्टर निघालेले नाही. यांच्याकडे जा त्यांचेकडे जा असे सांगून आम्हाला हकलून देता. म्हणून तहसीलदार यांनी या संदर्भात तातडीने दखल देऊन याची चौकशी करावी. या निवेदनावर शिवाजी देवलाल गायकवाड,सुलोचना रमेश पवार,राधाबाई अण्णा पवार, अनुसयाबाई सुकाश पवार,संताबाई सुरेश पवार यांचे नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here