खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – तालुक्यातील सोनखेडा येथील फुलमस्ता नदीवर असलेला पूल अखेरच्या घटका मोजत असून हा पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. खुप वर्षे जुना असलेला या पुलाचे आयुष्यमान संपलेले असताना पूलावरून वाहनांनीची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. प्रशासनाला मात्र या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी वेळ नाही.भविष्यात एखादी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सोनखेडा येथे असलेला हा पुल गावातुन मावसाळा,कागजीपूरा तसेच औरंगाबाद शहराला जोडणारा एक दुवा आहे.व गावातुन विटाची गाड्या,कार,टेम्पो अश्या विविध वाहने येतात.मात्र येथून जायला वाहनधारकांना तारेवर ची कसरत करावी लागत आहे. पावसामुळे पुलाने महापुराचे असंख्य धक्के सहन केलेले आहे. परंतु चिरेबंंदी दगडात बांधलेला हा पूल आज अखेरची घटका मोजत आहे. पुलावरून होत असलेल्या वाहतुकीमुळे पूलाला मोठया प्रमाणात हादरे बसत आहेत. पुलाच्या दगड खिळखिळे झाले आहेत. या पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्यात मागणी आता गावकर्यांसह वाहनधारकांनी केली आहे.
तसेच काट्शेवरी ते घोडेगाव जाण्यासाठी मुख्य रस्त्याची वाट लागली असुन सोनखेडा मार्गी शॉर्टकट म्हणून येत असतात.म्हणून वाहन धारकांची येथे नेहमी वर्दळ या मार्गावर असते. शिवाय या मार्गाने औरंगाबाद जाणऱ्या गाड्या देखील जात असतात. वाहतूकीसाठी महत्वाच्या असलेल्या या पुलाचे कठडे पडल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. वाहनधारकांना सोनखेडा येथील पुलावरून जाताना आपला जिव मुठीत घेऊन जावे लागते. तरी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष्य घालावे जेणेकरुन भविष्यात मोठी दुर्घटना टाळता येईल.







