शुक्रवार १६ ऑक्टोबर पंचाग

panchang

भारतीय सौर २४ आश्विन शके १९४२, अधिक आश्विन अमावास्या उत्तररात्री १.०१ पर्यंत,
चंद्रनक्षत्र: हस्त दुपारी २.५८ पर्यंत, चंद्रराशी: कन्या उत्तररात्री १.२४ पर्यंत, सूर्यनक्षत्र: चित्रा, सूर्योदय: सकाळी ६.३४, सूर्यास्त: सायं. ६.१४, चंद्रोदय: पहाटे ५.४७, चंद्रास्त: सायं. ६.१३.

 

 

 

आजचे शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त : पहाटे ०४ वाजून ४३ मिनिटे ते ०५ वाजून ३३ मिनिटे.
अभिजित मुहूर्त : सकाळी ११ वाजून ४३ मिनिटे ते दुपारी १२ वाजून २९ मिनिटे.
विजय मुहूर्त : दुपारी ०२ वाजून ०१ मिनिट ते ०२ वाजून ४७ मिनिटे.
गोधुलि मुहूर्त : सायंकाळी ०५ वाजून २९ मिनिटे ते ०६ वाजून ०३ मिनिटे.
निशिथ काळ : रात्रौ ११ वाजून ४२ मिनिटे ते १२ वाजून ३२ मिनिटे.
अमृत काल : सकाळी ०९ वाजून ४३ मिनिटे ते ११ वाजून ०७ मिनिटे.

 

 

 

 

आजचे अशुभ मुहूर्त :
राहु काळ : सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते दुपारी १२ वाजेपर्यंत.
यमगंड : दुपारी ०३ वाजून ३० मिनिटे ते ०४ वाजून ३० मिनिटे.
गुलिक काळ : सकाळी ०७ वाजून ३० मिनिटे ते ०९ वाजेपर्यंत.

 

 

 

दिनविशेष:
दर्श अमावास्या,
पुरुषोत्तममास समाप्ती,
अधिकमास समाप्ती,
जागतिक अन्न दिन.
आज १६ ऑक्टोबर… ‘जागतिक अन्न दिवस’. आपल्या देशात दर मिनिटाला कुपोषणामुळं दोन बळी जातात. घरात इन मीन तीन माणसं असतानाही नको तितकं रांधून रात्री अन्न फेकून दिलं जातं. हॉटेलमधून पार्सल आणलं की घरातील पोळीभाजीकडं कोणी पाहतही नाही… अन्नाची ही अशी ‘किंमत’ केली जात आहे. उत्पादित अन्नधान्य व फळांपैकी सुमारे ४० टक्के सडून/सांडून वाया जातंय. त्यामुळं अन्नाची नासाडी रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.

 

 

 

 

आजचे राशिभविष्य :

मेष : अचानक उभवणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. बुद्धीला पटेल तोच निर्णय घ्या. संमिश्र घटनांचा दिवस. कार्यालयातील अधिकारी वर्गाशी मतभेद होऊ शकतील. आपल्या माणसांची योग्य साथ लाभेल. मन प्रसन्न होईल. वैवाहिक जीवनातील सुलभता वाढीस लागेल.

वृषभ : घरामध्ये शुभ वार्ता समजतील. संततीच्या उत्कर्षाचा काळ. व्यापारी वर्गाला अधिक मेहनत, परिश्रम घेण्याचा दिवस. सरकारी कर्मचाऱ्यांचे कार्यालयात मतभेद होऊ शकतात. दिवसाच्या उत्तरार्धात जनसंपर्कातून लाभ मिळू शकतील. नवीन योजनांवर लक्ष केंद्रीत कराल. अचानक एखादा उत्तम लाभ मिळू शकेल. मित्रांची मदत मोलाची ठरू शकेल. गुंतवणुकीतून लाभ शक्य.

मिथुन : नोकरीच्या संधी येतील. नवीन तंट्यामध्ये स्वतःला उगाच गोवून घेऊ नका. लाभदायक दिवस. दिवसाच्या पूर्वार्धात प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतील. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. नोकरी, व्यवसायाशी संदर्भात एखादे प्रकरण मिटेल. दिवसाचा उत्तरार्ध कुटुंबासोबत उत्तमपणे व्यतीत होऊ शकेल. मुलांचे एखादे कृत्य त्रस्त करू शकेल.

 

 

 

 

कर्क : आपल्या अधिकाराचा अति वापर टाळा. नोकरी व्यवसायात मर्जी राखाल. आत्ममग्न राहाल. केवळ आपल्या कामाकडे लक्ष केंद्रीत करून कार्यरत राहणे हिताचे ठरू शकेल. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. जनसंपर्कात भर पडू शकेल. समाजातील आपला प्रभाव वृद्धिंगत होईल. गुंतवणुकीसाठी अनुकूल कालावधी.

सिंह : कुटुंबातील सौख्याचा समतोल राखा. कलाक्षेत्राबाबत आपल्याला अपेक्षित अशा वार्ता समजतील. हितशत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मात्र, त्यांना यश मिळणार नाही. अनामिक भीतीने मन विचलित होऊ शकेल. नवीन संधीतून उत्तम लाभ मिळू शकतील. सामाजिक जबाबदारी वाढेल. अनोळखी व्यक्तींची आर्थिक व्यवहार टाळावेत. नुकसान संभवते.

कन्या : नवीन क्षेत्रातील गुंतवणूक योग्य व्यक्तीच्या सल्ल्याविना करू नका. मोठी वाहने चालवताना काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. रचनात्मक कार्याची आवड वाढेल. कोणाची वाद झाल्यास रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. दिवसाच्या उत्तरार्धात अचानक लाभ मिळू शकेल. प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतील. वादाचे प्रसंग टाळावेत.

 

 

 

 

तुळ : घरातील मोठ्यांचे अनुभवाचे सल्ले नक्की उपयोगी पडतील. अचानक येणाऱ्या खर्चाला योग्य पद्धतीने सामोरे जा. पद आणि महत्त्वाकांक्षेची अभिलाषा पूर्ण होऊ शकेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केले जाईल. एखाद्या घटनेने मन विचलित होऊ शकेल. समस्याच्या निराकरणाबाबत संभ्रम निर्माण होऊ शकेल. इच्छा नसतानाही प्रवास करावे लागू शकतील.

वृश्चिक : लोकांवर संपूर्ण अवलंबून राहू नका. पुढे ढकललेले कामे पुन्हा हातात घ्या. संमिश्र घटनांचा दिवस. विनाकारण मन विचलित होऊ शकेल. शक्यतो घराच्या बाहेर पडू नये. सावधगिरी बाळगून दैनंदिन व्यवहार करावेत. निराशाजनक विचार टाळावेत. मुलांकडून शुभवार्ता मिळू शकतील. रुचकर भोजनाचा आनंद घेऊ शकाल. मन प्रसन्न होईल.

धनु : दूरदृष्टीने पुढील योजना आत्ताच आखून ठेवा. नोकरीत आपल्या मुद्द्यांवर ठाम रहा. प्रलंबित कामे मार्गी लागल्याने मन प्रसन्न होईल. कुटुंबातील सदस्यांची योग्य साथ लाभेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. दैनंदिन व्यवहारात निष्काळजीपणा करू नका. नवीन संपर्कातून उत्तम लाभ मिळतील.

 

 

 

 

मकर : जोडीदाराच्या साथीने आपल्या मनोकामना पूर्ण होतील. व्यवसायात अति विश्वास ठेवू नका. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. पराक्रमात वाढ होईल. हितशत्रू, विरोधक पराभूत होतील. दिवसाच्या उत्तरार्धात खर्चात वाढ संभवते. चांगल्या लोकांच्या सहवास वा संपर्काने मन प्रसन्न होईल. उत्साहाने कार्यरत राहाल. कौटुंबिक नातेसंबंध सुधारतील.

कुंभ : कोणाकडून फसवले जाणार नाही त्याची खात्री बाळगा. आरोग्याच्या कोणत्याही तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. ग्रहांची अनुकूलता लाभदायक तसेच यशकारक ठरू शकेल. आवडीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील. अचानक पाहुण्यांचे आगमन होऊ शकेल. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल.

मीन : नातेवाईक अथवा मित्रांच्या सल्ल्यावर विचार करा. आहारात आवश्यक ती पथ्ये पाळा. भाग्याची भक्कम साथ लाभेल. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. मुलांकडून शुभवार्ता मिळू शकतील. दिवस उत्तम पद्धतीने व्यतीत होईल. स्पर्धेत यश शक्य. एखादी विशेष गोष्ट साध्य केल्याने आनंदाची अनुभूती घेऊ शकाल. मात्र, मोसमी आजार त्रस्त करू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here