पुणे (प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले) – आज आपण सर्वजण बघत आहोत कि कोविड १९ या महामारीमुळे संपूर्ण जग हे त्रस्त आहे. सर्व देशांतील शास्रज्ञ औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या या भारत देशाचा आपण देखील एक भाग आहोत. 
आपली देखील समाजाप्रती काहीतरी जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव म्हणून “सत्कर्म दिव्यांग फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य” च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सर्व दिव्यांग बंधू – भगिनींना आणि इतर मित्र परिवारानी येवुन रक्त दान केले या कार्यक्रमामध्ये सहभागी होते
कार्यक्रमास उपस्थित पदाधिकारी,दिनेशजी मालविया अध्यक्ष ,महेश मिस्त्री,ओंकार पवार,अभिलाषा मानकर,सोनाली मालविय,त्रिवेणी जाधव,अर्चना ताई घुंडरे,वनिता देगलूरकरअनेक नगरसेवक आले होते.







