मुंबई (प्रतिनिधी सिद्धार्थ जाधव) – दिनांक 15/10/2020 एका मानसेवी होमगार्ड वय 34 राहणार गुगुळ पिप्री जिल्हा हिंगोली कडून हिंगोली ते वाशिम जिल्हा कार्यालय अंतर्गत बदली करिता ना हरकत प्रमाणपत्र देण्यात करिता वाशिम होमगार्ड अधीक्षक श्री अशोक तुळशीराम आसोलकर यांना 1000 रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे अशा बेइमान अधिकार्यामुळे मानसेवी होमगार्डचे खूप मोठ्या प्रमाणात अधिकारी नुकसान करत आहे
सदर श्री आसोलकर यांना दीड लाख रुपये पगार असून सुद्धा लाचेची मागणी करणे खूप निर्दयी बाब आहे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यावर हिंगोली वाशिम अपर पोलीस अधीक्षक व महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य श्री संजय पांडे हे कारवाई करतील का? या अशा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पाठबळामुळे लाच घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे याच प्रमाणे महासमादेशक कार्यालयातील श्री संजय पांडे महा समादेशक होमगार्ड यांचे पीए विजय पवार यांच्यावर तीसुद्धा अँटी करप्शन ब्युरो मार्फत कारवाई होणे गरजेचे आहे कारण सदर अधिकाऱ्यावर विभागाने मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले आहे आणि तीनशे कोटीचा घोटाळा हा झालेला आहे तरी महासमादेशक कार्यालयातील संपूर्ण वेतनी अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे
अनेक वेतनी प्रशासकीय अधिकारी व कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी व निर्देशक वर्ग हे गणवेश परिधान करण्याचे शासनाचे व महासमादेशक यांचे आदेश नसून सुद्धा सुद्धा लाल बूट खाकी गणवेश परिधान करून शासनाची व मानसेवी होमगार्ड अधिकारी यांचा गणवेश घालून महासमादेशक मुख्यालय मुंबई येथील कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्री धकाते हेसुद्धा गणवेश घालून फसवणूक करत आहे तरी महा समादेशक होमगार्ड श्री संजय पांडे यांनी आजपर्यंत कोणतीच कार्यवाही केली नाही तरीसुद्धा त्यांच्यावर ती आजपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही लाच घेणाऱ्या अधिकार या विरोधात होमगार्ड संघर्ष समिती आंदोलन करण्याच्या तयारीत आहे
कारण हिंगोली वाशिम होमगार्ड अधीक्षक श्री आसोलकर यांच्यावरती कलम 7 ला प्र कायदा सुधारित 2018 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई श्री श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक , मा श्री पंजाबराव डोंगर दिवे अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल होमगार्ड संघर्ष समितीकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे







