महावितरणच्या दक्षतेमुळे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत

kolhapur

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – शहरातील महावितरणच्या जरगनगर शाखा कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी मुसळधार पाऊस व काळोख्या रात्रीतही कोल्हापूर शहराच्या निम्म्याहून अधिक भागास पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रास वीजपुरवठा असणाऱ्या ११ के. व्ही. संभाजीनगर फीडरवरील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत केला.

 

 

 

 

रात्री साडेबाराच्या सुमारास फिल्टर हाऊस येथे तांत्रिक बिघाड झाल्याने ११ के. व्ही. संभाजीनगर फीडर बंद पडला. त्यामुळे या फीडरवरील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा ठप्प झाला. दरम्यान महापालिकेच्या जलाभियंत्यांनी संपर्क साधून शहरास पाणी पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी वीज पुरवठा सुरळीत करावा, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

 

 

 

 

शाखा अभियंता अश्विनकुमार वागळे यांच्या सूचनेनुसार शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी जोखीम पत्करत रात्री दीड वाजता प्रधान तंत्रज्ञ सचिन बाचनकर, वरिष्ठ तंत्रज्ञ उमेश अंबित व तंत्रज्ञ किरण जठार या कर्मचाऱ्यांनी तांत्रिक बिघाड दुरुस्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here