मुंबई (गणेश तळेकर) – बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या कारला एका बाईकने पाठीमागून धडक दिली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. परंतु किरकोळ वाद झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विरल भयानीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून रणवीरच्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. यात वांद्रे येथील एका बाईक स्वारने रणवीर सिंहच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. यानंतर रणवीरने गाडीतून बाहेर येऊन आपली गाडी पाहिली. यानंतर तो दुसऱ्या मिनिटांत गाडीत जावून बसला. या घटनेत रणवीर आणि बाईकस्वार दोघांपैकी कोणालाही इजा झाली नाही. पण रणवीर गाडीतून अचानक बाहेर आल्याने त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली.
रणवीर सिंह लवकरच कबीर खान यांच्या ‘८३’ या चित्रपटात कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच तो यशराज बॅनरच्या ‘जयेश भाई जोरदार’ मध्ये देखील दिसणार आहे.







