गुगलमुळे सचिन तेंडूलकरची मुलगी सारा ‘या’ क्रिकेटरची झाली पत्नी

sara-tendulkar

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – सोशल मीडियावर रोज काहींना काही तुफान व्हायरल होतं. याआधी गुगलनं विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला राशिद खानची पत्नी असल्याचे दर्शविले होते. यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्स शेअर करण्यात आले होते. आता आणखी अशाच एका घटनेची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. आता गुगलनं भारताचा क्रिकेटर आणि कोलकाता नाइट रायडर्सचा संघाचा एक भाग असलेल्या शुभमन गिलची पत्नी म्हणून सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकर हिला दाखविले आहे.

 

 

सध्या सारा आणि शुभमन गिल हे चर्चेत आहेत. याआधी कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान शुभमन गिलचा फिल्डिंगचा एक फोटो साराने आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर लावला होता. याला हार्ट आकाराच्या इमोजीचा वापर केला होता. त्यानंतर काहीवेळातच तो हटवला होता.sara

 

 

 

याआधी शुभमन गिलने कारसह आपला फोटो शेअर केला होता. या फोटाला साराने लाईक केले होते. तिने कमेंटमध्ये हार्ट इमोजीसोबत त्याचे अभिनंदन केले होते. या पोस्टची टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्याने शुभमन गिलची खिल्ली उडवत मजा घेतली होती. शुभमन गिल सध्या यूएईत कोलकाता नाइट रायडर्स टीमसोबत आहे. तो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे.

 

 

याआधी राशिद खानची पत्नीला सर्च केल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचा फोटा गूगलनं दाखवला होता. राशिद खानने एका इंस्टाग्राम शो दरम्यान आपली फेवरेट ॲक्ट्रेस म्हणून अनुष्काचे नाव घेतले होते. ज्यामुळे गुगलनं राशिद खानची पत्नी म्हणून अनुष्काला दाखविले होते. आता पुन्हा एक घोळ झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here