पंचांग, शनिवारी, दि.१७ ऑक्टोबर २०२०

panchang

भारतीय सौर २५ आश्विन शके १९४२, निज आश्विन शुक्ल प्रतिपदा रात्री ९.०९ पर्यंत,
चंद्रनक्षत्र: चित्रा सकाळी ११.५१ पर्यंत, चंद्रराशी: तूळ, सूर्यनक्षत्र: चित्रा, सूर्योदय: सकाळी ६.३५, सूर्यास्त : सायं. ६.१३, चंद्रोदय: सकाळी ६.५०, चंद्रास्त: सायं. ६.५९.

 

 

 

आजचे शुभ मुहूर्त :
अभिजित मुहूर्त : सकाळी ११ वाजून ४३ मिनिटे ते दुपारी १२ वाजून २९ मिनिटे.
विजय मुहूर्त : दुपारी ०२ वाजून ०२ मिनिटे ते ०२ वाजून ४६ मिनिटे.
गोधुलि मुहूर्त : सायंकाळी ०५ वाजून ३८ मिनिटे ते ०६ वाजून ०२ मिनिटे.
निशिथ काळ : रात्रौ ११ वाजून ४२ मिनिटे ते १२ वाजून ३२ मिनिटे.
अमृत काल : मध्यरात्री ०१ वाजून १० मिनिटे ते ०२ वाजून ३४ मिनिटे.
सर्वार्थ सिद्धी योग : संपूर्ण दिवस.

 

 

 

 

आजचे अशुभ मुहूर्त :
राहु काळ : सकाळी ०९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटे.
यमगंड : दुपारी ०१ वाजून ३० मिनिटे ते ०३ वाजून ३० मिनिटे.
गुलिक काळ : सकाळी ०६ वाजेपासून ते ०७ वाजून ३० मिनिटे.

दिनविशेष:
निज आश्विन मासारंभ,
नवरात्रारंभ, घटस्थापना,
मातामह श्राद्ध,
संत मुक्ताबाई जयंती,
संत बहिणाबाई पुण्यतिथी.

 

 

 

 

 

आजचे राशिभविष्य

मेष : घरामधील महत्त्वाच्या चर्चेत स्त्रीवर्गाच्या मतांचा विचार करा. विद्यार्थी वर्गाला चांगला काळ. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ असेल. हाती घेतलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील. मन प्रसन्न राहील. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद संभवतात. दिवसाच्या उत्तरार्धात योजनापूर्तीचा आनंद होईल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

वृषभ : संभ्रमित अवस्थेत असला तर आपला निर्णय पुढे ढकला. घरातील कामासाठी वेळ बाजूला ठेवा. दिवसभरात काही ना काही समस्या उद्भवू शकतील. नोकरदार आणि व्यापारी वर्गाचा कामात व्यत्यय येईल. कार्यकौशल्याच्या जोरावर विरोधकांना पराभूत करू शकाल. गृहपयोगी वस्तूंची खरेदी कराल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. चांगल्या गोष्टींसाठी पैसे खर्च होतील. मान, सन्मान वाढतील.

मिथुन : नवीन गोष्ट शिकण्यासाठी उत्तम काळ. इच्छुकांचे लांबलेले विवाह ठरतील. ग्रहांचा प्रभाव समस्याकारक ठरू शकेल. अगदी शेवटच्या टप्प्यात काम बिघडू शकेल. कार्यक्षेत्रात वादाचे प्रसंग उद्भवू शकतील. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतील. मुलांच्या वर्तन त्रस्त करू शकेल. वाहन चालवताना योग्य ती खबरदारी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवून कार्यरत राहणे हिताचे ठरू शकेल.

 

 

 

 

कर्क : घरातील अडचणीच्या घडामोडींवर तोडगा निघेल. स्थैर्य असलेल्या व्यवसायात गुंतवणूक करा. ग्रहांची अनुकूलता भाग्यकारक ठरेल. आप्तेष्टांचे उत्तम सहकार्य लाभेल. सामंजस्याने काही गोष्टी हाताळाव्या लागतील. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. जोडीदाराचे मदत मोलाची ठरू शकेल. नोकरदार वर्गाला प्रगतीकारक दिवस. मानसिक शांतता मिळू शकेल.

सिंह : नवीन नोकरीच्या मुलाखतीत यश येईल. मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. समाजातील प्रतिमा सुधारेल. नवीन काम सुरू करण्यापूर्वी सर्व गोष्टी तपासून घ्याव्यात. कोणावरही अंधविश्वास ठेऊ नका. कर्जाचे व्यवहार आज करू नका. पदोन्नतीचे योग. गुरुच्या प्रभावामुळे भाग्याची उत्तम साथ लाभेल.

कन्या : नवीन क्षेत्रातील गुंतवणूक योग्य व्यक्तीच्या सल्ल्याविना करू नका. मोठी वाहने चालवताना काळजी घ्या. आजचा दिवस शुभ असून, हाती घेतलेली सर्व कामे पार पडतील. मित्रांसोबत उत्तम काळ व्यतीत होऊ शकेल. मान, सन्मान मिळतील. जबाबदारी वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल.

 

 

 

 

तुळ : आयुष्यातील चालू घडामोडींना चांगली गती मिळेल. हितचिंतकांकडून लाभ होईल. ग्रहांची अनुकूलता सुखकारक ठरू शकेल. गृहपयोगी आणि आवडत्या वस्तूंची खरेदी कराल. जोडीदाराचे सहकार्य आणि सानिध्य मिळू शकेल. व्यवसाय वृद्धी वा विस्ताराचे प्रयत्न यशकारक ठरतील. मान, सन्मान वाढीस लागेल. मात्र, दिवसाच्या उत्तरार्धात मौल्यवान वस्तू गहाळ होण्याचे संकेत. सावध राहावे.

वृश्चिक : कोणाकडून फसवणूक होऊ देऊ नका. व्यवसाय क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. एखाद्या व्यक्तीसाठी व्यवस्था करण्यात दिवस व्यतीत होऊ शकेल. धावपळ संभवते. परोपकार केल्याचे समाधान मिळू शकेल. कार्यालयातील सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतील. केवळ आपल्या कामाकडे लक्ष केंद्रीत करावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

धनु : कामाचा पसारा आवरता ठेवा. खात्री करूनच समोरच्यावर विश्वास ठेवा. विनाकरण मन अशांत राहील. धैर्य आणि मृदू व्यवहाराने वातावरण अनुकूल होऊ शकेल. काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. दिवसाचा उत्तरार्ध हास्य-विनोद, मौज-मजा करण्यात जाईल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. शुभवार्ता मिळू शकतील.

 

 

 

 

मकर : नोकरीमध्ये अति कामाच्या अंगावर आलेल्या बोजाचे योग्य पद्धतीने नियोजन करा. नवीन करारात आपण भागीदार होऊ शकाल. कुटुंबातील व्यक्तीच्या प्रकृतीची चिंता लागू राहील. वाहन चालवताना योग्य ती खबरदारी घ्यावी. जोखीम पत्करू नका. कोणालाही कर्ज देणे टाळावे.

कुंभ : भागीदारी व्यवसायात नवीन संधी चालून येईल. छोटे प्रवास घडतील. मोठे यश प्राप्त होऊ शकेल. आनंदाची अनुभूती घेऊ शकाल. जोडीदाराशी असलेले नाते दृढ होऊ शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. बाहेर फिरायला जाण्याची इच्छा प्रबळ होईल. ऊर्जा आणि सकारात्मकतेचा संचार होईल. उत्साहाने कार्यरत राहाल.

मीन : समाजात मोठ्या व्यक्तीकडून सन्मान होईल. दिवसाचा उत्तरार्ध आनंदी जाईल. ग्रहांचा शुभ प्रभाव यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त करू शकेल. आपण घेत असलेल्या मेहनतीचा लाभ मिळू शकेल. विद्यार्थ्यांना यशकारक दिवस. कार्यालयात स्वतःला सिद्ध करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. कार्यक्षेत्रातील प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here