रावेर (तालुका प्रतिनिधी हमीद तडवी) – तालुक्यातील बोरखेडा रस्त्यावरील एका शेतातील घरात रहिवास करीत असलेले आदिवासी कुटूंबातील आई वडील बाहेर गेले याचा पुरेपुर फायदा उचलत संकुचित वृत्तीच्या भामट्यांनी चार भावंडांचा धारदार कुऱ्हाडीने वार करुन निर्घुण हत्या काल सकाळी घडली.या घटनेचा तपास लावण्यासाठी नाशिक पोलीस महासंचालकांच्या सुचनेनुसार जळगाव पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंडे यांनी पोलीस दलाचे तीन पथक तयार केले होते,त्यानुसार राञी उशीरा पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बोरखेडा येथील चार भावंडांचे हत्याकांड झाल्यानंतर पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंडे हे घटनास्थळी ठाण मांडुन राञीपर्यंत पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे,यामुळे या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे समजते.रावेर नजिक बोरखेडा शेतीशिवारात आदिवासी चार भावंडांच्या हत्याकांडामुळे संपुर्ण महाराष्ट्र हादरला असतांना युवा आयपीएस पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंडे यांनी हे प्रकरण अतिशय संयमाने हाताळत पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे तसेच उत्तर प्रदेशची घटना ताजी असतांनाच रावेर तालुक्यात बोरखेडा शिवारात घडलेल्या घटनेने संपुर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे.
ही घटना काल सकाळी पोलीस प्रशासनाला कळताच जळगाव पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंडे यांनी क्षणाचा विलंब न करता सकाळी दहाच्या आधी घटनास्थळ गाठले होते,घटना जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरत होती,म्हणुन लोकांची घटनास्थळी गर्दी जमत होती,पोलीस गर्दी पांगवत असतांना स्वतः एसपी डॉ प्रविण मुंडे यांनी सर्व कायदा-सुव्यवस्था सांभाळत लोकांना समजुन सांगत होते, त्यांनी सामाजिक व राजकिय दृष्ट्या तसेच मीडीया पञकार यांना कोणालाच रोखुन धरले नाही, प्रत्येकाला विचारपुस करु दिली त्यामुळे बाहेरुन आलेले लोकप्रतिनिधी,पुढारी, सामाजिक कार्यकर्ते,व पञकारांना या प्रकाराची माहिती मिळाली.
दरम्यान पोलीस अधिक्षक डॉ मुंढे यांनी आपल्या सहकारी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,आयपीएस कुमार चिंथा,डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्यासह बाकी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे हे स्वतः घटनास्थळी ठाण मांडुन बसल्याचे दिसुन आले आहे.तर पाच संशयितांना ताब्यात घेतल्यामुळे आता या प्रकरणाचा उलगडा लवकरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.







