रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – रावेर तालुक्यातील बोरखेडा गावाजवळ काल शेतात आदिवासी भिल्ल परिवारातील चार अल्पवयीन मुलांचा कुऱ्हाडीने निघृण खून करण्यात आला.या घटनेचा एकता मंचचे राज्य सदस्य नसीर तडवी यांनी निषेध केला असून, गुन्हेगारांना २४ तासाच्या आत पकडून कठोर शिक्षा न केल्यास, एकता मंच न्यायासाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
रावेर तालुक्यातील बोरखेडा गावाजवळ .शेतात आदिवासी भिलाला परिवार 10 वर्ष पासुन सालदारकी करून आपला व आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह करत होते. त्याना तीन मुलं व दोन मुली असा परिवार होता नातेवाईकांकडे उत्तर कार्य असल्यामुळे आई वडील व मोठा भाऊ तिकडे गेले असता 15 वर्षाची मुलगी व सात वर्षाच्या मुलीसह दोन मुले असे चौघे भावड घरी होते.रात्री अनोळखी नराधमाने त्यांचा कुऱ्हाडीने निघृण खुन केला. 
ह्या प्रकरणात खुनाबरोबर अजुन काही घातपात घडला किवा काय हयाबाबत पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करण्यात यावी व सर्व सत्य समोर आणत गुन्हेगाराना कठोर शिक्षा करण्याची मागणी एकता मंचचे जिल्हा अध्यक्ष सलीम तडवी यांनी केली . एकता मंचने या अन्यायी घटनेचा तीव्र निषेध केला . घटने ठिकाणी एकता मंचचे राज्य सदस्य नसीर तडवी, सरफराज तडवी. सलीम तडवी. नबाब तडवी. लुखमान तड़वी. जाहगीर तडवी . रहेमान तडवी.लतीब तडवी समीर तडवी हसीना तडवी बबीता तडवी शाहरसुल तडवी रशीद तडवी उस्मान तडवी अल्लादीन तडवी हसन तडवी यांनी जाहीर निषेध केला







